आपण मरणोत्तर आपले कुटुंब अडचणीत येऊ नये म्हणून लाईफ इन्शुरन्स सगळेच काढतो . पण जिवंत असताना अचानक मेडिकल चा मोठा खर्च आला तर त्याची तरतूद कोठे करतो ? एकदा गंभीरतेने विचार करून बघा . कारोना च्य काळात हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला आहे
"Mediclaim Policy घेणे ही काळाची गरज आहे".
सध्याच्या युगात आयुर्मान जरूर वाढलेले आहे पण Quality of Life नक्कीच घटत चाललेली आहे. सगळेच आजार आता तरुण वयात येताना दिसताहेत. Obesity, Diabetes, Hypertension , Osteoarthritis, Thyroid disease, Ankylosing Spondylosis, मान व कंबर दुखी आणि असे बरेच आजार २०-३० या वयातच जडत आहेत . याला आपणच जबाबदार आहोत. आपली जीवन शैलीच याला पूर्णपणे जबाबदार आहे. आपण म्हातारपणी आपले आयुष्य सुखाचे जावे म्हणून पेन्शन प्लॅन घेतो , पण चालू आयुष्य निरोगी ठेवण्याचे किती प्रामाणिक प्रयत्न करतो ते जरा तपासून पाहा . आणि मग जर ते करत नसू तर आजार होणारच आहेत हे पक्के लक्षात असुदेत. सध्या मेडिकल ची ट्रीटमेंट कॉस्ट प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये प्रचंड वाढली आहे . क्वालिटी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खिसा रिकामा होणारच आहे. तंत्रज्ञानाच्या ह्या युगात एक ५० बेड सुसज्ज हॉस्पिटल उभे करायचे झाले तर त्यासाठी कमीत कमी ५० कोटी इतके भांडवल लागते . मग साहजिकच ट्रीटमेंट कॉस्ट वाढणारच.
ह्या सर्व चक्रातून सुटायचे असेल तर एकतर आजार होऊच देऊ नका ! नाहीतर मेडिकल चा खर्च Mediclaim policy नी secure करा. पण याचा असा अर्थ नाही की कसेही जगा , mediclaim policy च्या लिमिट वर खर्च गेला तरीही पंचाईतच की .
१.Mediclaim policy कशी असावी :-
सध्या बऱ्याच प्रायव्हेट कंपन्या mediclaim policy घेऊन बाजारात आल्या आहेत. Policy ही कॅशलेस असावी. म्हणजेच एखाद्या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट साठी admit झालात तर पूर्ण खर्चाची जबाबदारी हॉस्पिटल ची असते . ते हॉस्पिटल त्या कंपनी(mediclaim पॉलिसी च्या) ला tie-up असते आणि ट्रीटमेंट साठी लागणारा संपूर्ण खर्च (पॉलिसी च्या लिमिट मध्ये असल्यास) हॉस्पिटल mediclaim च्या कंपनी कढून मिळवते. पेशंट ला त्या खर्चाचा भुर्दंड पडत नाही.
जर ते हॉस्पिटल त्या कंपनी शी tie -up नसेल आणि तुम्हाला तिथेच (त्याच हॉस्पिटल मध्ये) ट्रीटमेंट घायची असेल तर मग Re-embersment चा ऑप्शन निवडावा लागतो . म्हणजेच तुम्हाला होणाऱ्या ट्रीटमेंट चा सर्व खर्च तुमच्या खिशातून भरावा लागतो आणि मग mediclaim कंपनी कडून तो परत मिळवावा लागतो. ह्यात दोन तोटे आहेत . पहीला म्हणजे तुम्हाला आधी खर्च करावा लागतो आणि दुसरा म्हणजे तो परत मिळवावा लागतो ज्यासाठी बरेच पापड बेलावे लागतात.
२. TPA म्हणजे काय? आणि कुठली कंपनी अधिक चांगली ?
TPA म्हणजेच Third Party Assistance , म्हणजेच ती कंपनी जी प्रत्यक्षात तुम्हाला पैसे देणार आहे . भारतात United India Insurance , New India Insuarance , Oriental India Insuarance अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या customer कडून डायरेक्ट mediclaim policy घेतात पण ते स्वतः customer ला पैसे देत नाहीत. ह्या कंपन्या TPA ची मदत घेऊन त्यांच्या करवी mediclaim settle करतात.
मग डायरेक्ट TPA कडे का जाऊ नये?असा ही प्रश्न तुमच्या मनात येईल. अगदी बरोबर आहे . कॉर्पोरेट policies शक्यतो वरील तीन पैकी असतात आणि त्या मग TPA शी tie -up करून घेतात. तुम्हाला स्वतःला जर individual policy काढायची असेल डायरेक्ट TPA थ्रू mediclaim केलेला केव्हाही चांगला. सगळ्याच कंपन्या at par आहेत.
३.कुठला TPA चांगला ?
पॉलिसी घेताना TPA che track record तपासणे फार महत्त्वाचे आहे . ती कंपनी किती वर्ष जुनी आहे? , त्याचे ट्रॅक रेकॉर्ड कसे आहे ?,त्यांनी आत्ता पर्यंत किती claims hasselfree सेटल केले आहेत? हे बघणे गरजेचे आहे .
बाजारात जवळ पास १०० एक कंपन्यांचे mediclaim policies आहेत. पण त्यात
STAR health, Mediassist, MD India, ICICI Lombard , Bajaj Allianz, Health India, Religare, HDFC ergo, Tata AIg , Future Generale, Paramount ह्या कंपन्या जास्त प्रचलित आहेत आणि त्यांचे claim settelment चे ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे .
४. Policy किती लाखांची असावी ?
कमीत कमी १० लाखांची असावी . कारण सध्या ट्रीटमेंट जास्त वेळ घ्यावी लागली किंवा आजार मोठा असेल तर त्या ट्रीटमेंट चा खर्च ही खूप मोठा असतो . त्यातून कॅन्सर असेल तर १०लाख सुद्धा कमी पडू शकतात.
५. Mediclaim policy काढल्यावर सगळे आजार लगेच कव्हर होतात का?
सर्व प्रथम या भ्रमात राहू नका की पॉलिसी काढली की लगेच सर्व आजार कव्हर होतात.
पूर्वीचा किंवा आधीचा जर काही आजार असेल आणि तो तुम्ही पॉलिसी करताना दाखवला नाही आणि नंतर असे लक्षात आले की तो आजार जुना आहे (सत्य कधीच लपत नाही , ते केव्हा ना केव्हा तरी बाहेर येतेच)तर तुमची पॉलिसी रद्दबातल होऊ शकते .
तिसऱ्या वर्षी पासून सर्व मोठे आजार आणि पॉलिसी च्या लिमिट मध्ये बसत असलेला कोणताही आजार आणि त्याची ट्रीटमेंट कव्हर होते .
Accident cover हे डे1 पासून चालू होते . त्यामुळे ज्यांची पॉलिसी नुकतीच काढली आहे आणि accident होऊन हाड मोडले असेल तर काळजी करू नका , ते पॉलिसी मध्ये पूर्ण कव्हर असते .
पॉलिसी रुजू करून घेताना एजंट तुम्हाला ही सर्व माहिती देतीलच असे नाही . अगदी छोट्या अक्षरात ह्या टर्म्स आणि कंडिशन्स लिहिलेल्या असतात ज्या उत्तम दृष्टी असलेल्या माणसाला सुद्धा दिसत नाहीत आणि आपण बिनधास्त कोऱ्या फॉर्म वर काहीही न वाचता सही करून देतो.
६.Mediclaim च्या policy चा साधारण प्रीमियम किती असतो ?
१० लाखाची पॉलिसी केलीत तर त्याचा premium साठ वयाच्या च्या आत असाल तर अंदाजे एक वर्षासाठी १० ते १५ हजार इतका असतो. आपण हिशोब काढला तर ह्यापेक्षा कित्येक जास्त पैसे आपण एकावर्षात आपल्या आरोग्यासाठी खर्च करतो.
४०शी च्या आत असाल तर प्रीमियम अजून कमी पडतो आणि ६० च्या वर असाल तर तो नक्कीच जास्त पडतो.७० वयानंतर सहसा पॉलिसी निघत नाही .
तर चला मग प्रियजनहो,
अजून घेतली नसेल mediclaim policy तर घेऊन टाका लगेच!
नका दवडू वेळ, आहे ही काळाची गरज , घ्या आणि निश्चिंत व्हा तसेच !!
Share your comments