काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही.१) ध्यानधारण करणे झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान२) मंत्रोच्चार दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो.
३) योगासने करणे - नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो.४)मसाज करणे - झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात.ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.
५) मॅग्नेशियम आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जातच असतात. ह्यापैकी मॅग्नेशियम ह्या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते.६) आवडते शांत संगीत ऐकणे संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते.
संगीतामुळे आपले मन शांत होते, शरीर सैल होते त्यामुळे आपल्याला झोप यायला सुरुवात होते.झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
Nutritionist & Dietician
Naturopathistb
Dr. Amit Bhorkar
whats app: 9673797495
Share your comments