1. आरोग्य सल्ला

चला तर आज जाणुन घेऊ न्युमोनिया बद्दल

12 नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्युमोनिया दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
चला तर आज जाणुन घेऊ न्युमोनिया बद्दल

चला तर आज जाणुन घेऊ न्युमोनिया बद्दल

'न्युमोनिया' हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली -म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.

सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे. तरी पण जगभराच्या म्रृत्यूचे न्यूमोनिया हे सातवे कारण आहे.न्यमोनियाची लक्षणे ताप, थंडी वाजणे, खोकला, श्वास जलद होणे (गति वाढणे), श्वास घेताना धाप लागणे, छातीत आणि पोटात दुखणे, शक्तिपात, उलट्या, इ.- जिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.- विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. याशिवाय 12-36 तासात रुग्णास अधिकाधिक श्रेणीमध्ये श्वास लागतो.

श्वसन अपुरे होते, कफ़ तीव्र होतो, थोडा कफ पडतो. ताप वाढतो.श्वास घेणे कठीण होते. आणि ओठ निळे पडतात. टोकाच्या गुंतागुंतीमध्ये जिवाणू संसर्ग होतो.- मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे भिन्न आहेत. याला चालता फिरता (वॉकिंग) न्यूमोनिया म्हणतात. याची लक्षणे विविध आहेत. एकसारखी लक्षणे नसणे हेच याचे वैशिष्ट्य.घसाखवखवण्यापासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्यामध्ये होतो. दम्याच्या रुग्णामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया तीव्र आणि दीर्घकालीन स्वरूप घेतो.

 

 Nutritionist & Dietitian

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 7218332218

English Summary: Let's find out today about pneumonia Published on: 04 May 2022, 04:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters