आवळा हे सुद्धा एक औषधी प्रकारचे फळ आहे. आवळा हा चविला तुरट असतो.आवल्याला आयुर्वेद मध्ये स्थान प्राप्त झाले आहे. आवळा शरीरात खूप गुणकारी असतो.आवळ्याचे सेवन केल्यावर अनेक आजारांपासून आपल्याला सुटका मिळते.
असंख्य रोगापासून संरक्षण:
आवळा आमला या संस्कृत नावानेही ओळखला जातो.आवळा इतर संस्कृत टोपण नावे आई, नर्स आणि अमरत्व अशी नावे आहेत.आयुर्वेद आणि इतर आशियाई औषधी पद्धतींमध्ये हजारो वर्षांपासून आवळा वापरला जातो.आवळा हे फळ सर्व फळांपैकी सर्वात प्रभावी मानले जाते आणि आयुर्वेदिक दृष्टीने सर्वोत्कृष्ट वर्गात समाविष्ट आहे. जर आपण आमलाची तुलना केली तर असे आढळले की त्यात संत्रा फळापेक्षा 8 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि त्यात ऑक्सिडंट सामर्थ्य जास्त असते तसेच डाळिंबाच्या 14 पट जास्त असते. म्हणून सुपरफूडच्या स्थितीत याचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. हे फळ सामान्य सर्दी, कर्करोग असंख्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते.
हेही वाचा:पपई खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते आणि इतर रोगांवर रामबाण औषध आहे पपई
आवळा खाल्ल्यावर शरीरावर होणारे फायदे:-
- ज्या लोकांना गॅस, ऍसिडिटी या प्रकारच्या समस्या आहेत त्या लोकांनी आवळा पावडरचे सेवन दिवसातून 2 वेळा करावे.
- आवळ्याचे सेवन केल्याने पोटसंबंधीत आजारांच्या तक्रारी कमी होतात आणि मेंदू सुद्धा शांत राहतो.
- आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये नेहमी आजारी पडतो, आजारी पडण्याचा कारण की आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टिम ही कुंमकुवत असते. त्यामुळं रोज आवळ्याचे सेवन केल्यावर सुद्धा आपल्या शरीरातील इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- आवळ्या मध्ये भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन असतात त्यामूळे ते आपल्या शरीरास खूप फायदेशीर असतात.कोरोनाच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
- आवळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपली त्वचा तजेलदार बनते. तसेच चेहऱ्यावर असणारे डाग सुरकुत्या वांग यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
- आवळ्याची पावडर मध्ये एक लिंबू मिक्स करून आपल्या डोक्यावरील केसांना लावल्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. ही क्रिया आठवड्यातून 3 वेळा करावी तसेच 4 आठवड्यापर्यंत ही कृती करावी.
- आवळ्यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते त्यामुळं डोळ्यासंबंधी आजार होत नाहीत.
- डोक्यात कोंडा झाल्यास आवळ्याची पावडर पाण्यात भिजवून लावल्यामुळे कोंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
Share your comments