1. आरोग्य सल्ला

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेले तसेच गुणकारी असलेले व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ,जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त हानी ही आपल्या त्वचेची आणि केसांची होत असते. केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन ई ची खूप आवश्यकता असते. उन्हाळामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता ही कमी होत असते.त्यामुळे आपले हात, पाय, त्वचा आणि ओठ कोरडे होतात.

किरण भेकणे
किरण भेकणे
groundnut

groundnut

कडक सूर्यप्रकाशाचा केसांवर जबरदस्त परिणाम होत असतो काही वेळा तर केसही कोरडे आणि निर्जीव होतात. अश्या काळात तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष्य दिले पाहिजे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला आहारात व्हिटॅमिन ई युक्त असलेल्या पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन ई युक्त आहार:-

1) बदाम:- बदाम हा व्हिटॅमिन ई ची खाण समजली जाते. कारण बदामामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त प्रमाणात असते.उन्हाळ्यात दररोज सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खावेत. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळते आणि केस आणि त्वचा यांचे आरोग्य चांगले राहते.

2)सूर्यफुलाच्या बिया:- शरीरातील व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमित सेवन केल्यामुळे केस गळणे, पांढरे होणे आणि रुक्षपणाची या सारख्या समस्या कमी होतात.

3)एवोकॅडो – व्हिटॅमिन ई च्या वाढीसाठी एवोकॅडो या फळांचे सेवन जरूर करा. एवोकॅडो हे फळ अतिशय महाग असले तरी याच्या सेवनाने तुमची त्वचा आणि केस चमकू लागतील. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन-सी देखील आढळतो.

4)शेंगदाणे:- दिवसातुन 2 वेळा शेंगदाणे खावेत कारण शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. जर का शेंगदाणे भिजवून खाल्ले तर ते जास्त लाभदायक असतात.

5)हिरव्या पालेभाज्या:-हिरव्या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई चा साठा असतो. तसेच हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. वेगवेगळी जीवनसत्त्वे,आयर्न आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता पालक खाल्ल्याने भरून काढता येते. त्यामुळे दैनंदिन जीवनात आहारात हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे.

English Summary: Learn about Vitamin E rich foods that are beneficial for hair and skin Published on: 29 April 2022, 08:49 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters