1. आरोग्य सल्ला

जाणून घ्या घशातील जंतुसंसर्ग, थ्रोट इन्फेक्शन लक्षणे आणि उपाय

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या घशातील जंतुसंसर्ग, थ्रोट इन्फेक्शन लक्षणे आणि उपाय

जाणून घ्या घशातील जंतुसंसर्ग, थ्रोट इन्फेक्शन लक्षणे आणि उपाय

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते.घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फॅरिन्जायटिसची कॉमन लक्षणे आहेत.घशाला हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते. मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात. पण लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते. असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.

उपाययोजना- १) घशाची सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.२) सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध, हळद, पुदिना यांचा चहा करा लिंबू पिळून प्या.३) घशाला झालेले इन्फेक्शन घालवण्यासाठी पेरूचे पान अत्यंत उपयुक्त आहे. पेरूच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ते चाऊन अथवा उकळून रस प्या.४) थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.५) घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम काढा प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. काढा मध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो.

असा काढा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.६) दोन मिर्याची पुड किंचित हळद, किंचीत काथाची पुड मधात घ्यावी.७) काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.८) गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा९) लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खायची.१०) मध व जेष्ठीमध पावडर, व हळद, कोरफडीचा गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा. दोन वेळा.११) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.१२) आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्या.१३) पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.१४) मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.(१५) पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.

१७) पुरेसा आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.आयुर्वेदिक उपाययोजना - १)खदिरादी वटी एक एक गोळी खडीसाखरे सोबत. यामुळे घसा सुजणे, पडजीभ सुजणे, ढास लागणे, घशातील खवखव, खरखर, कफ न सुटणे, घसा लाल होणे यात आराम मिळतो२) एलादी वटी एक एक चार वेळा घेतल्यास ही लवकर फरक पडतो.३) पोटातील अन्नरस घशात येऊन जळजळ आग आग होत असेल तर. जेवल्यानंतर अर्धा चमचा अविपत्तीकर चुर्ण थंड पाण्यात घ्या सोबत. व प्रवाळपंचामृत एक एक गोळी पाव कप दूधात घ्या. अनेक लोकांना घशाच्या जळजळीचा त्रास आहे टेस्ट नाँर्मल येऊन ही कारणं कळत नाही की घशात का जळजळ होतेय त्यानी हे उपाय केल्यास निश्चितच फरक दिसेलच.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Learn about throat infections, throat infection symptoms and remedies Published on: 11 July 2022, 07:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters