1. आरोग्य सल्ला

हळदीचं दूध प्राशन केल्यास मिळतील ‘हे’ 6 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

हळद ही औषधी गुणधर्मानी समृद्ध आहे तसेच आरोग्यासाठी वरदान आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हळदीचं दूध प्राशन केल्यास मिळतील ‘हे’ 6 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

हळदीचं दूध प्राशन केल्यास मिळतील ‘हे’ 6 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

हळद ही औषधी गुणधर्मानी समृद्ध आहे तसेच आरोग्यासाठी वरदान आहे. त्यामध्ये उपस्थित जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. दुधात हळद मिसळून नियमित सेवन केल्यास खूप फायदा होतो. सांध्यातील वेदना, सूज, सर्दी आणि तापापासून आराम मिळतो. जाणून घेऊया हळद दुधातील इतर फायद्यांविषयी.

१) सर्दी आणि खोकला हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल गुणधर्म आहेत.Cold and Cough Turmeric has antibacterial, antioxidant, antiviral properties.यामुळे हळद असलेले

रानभाज्या आहेत आरोग्यास लाभदायक, जे आपल्या मातीतून येतं ते फायद्याचच

दूध पिल्याने सर्दी, खोकला, ताप इत्यादीपासून आराम मिळतो.२) सांधे दुखीऔषधी गुणधर्म असलेले हळद असलेले दूध घेतल्यास हाडे मजबूत होतात. सांधे किंवा शरीरातील वेदना कमी होते. याबरोबरच सांधेदुखीच्या समस्येमध्ये त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे.

३) रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते हळदीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी,अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच शरीरात इन्फेक्शन आणि अनेक आजाराचा धोका कमी असते.४) रक्त साफ करतेहळदीचे दूध नियमितपणे प्यायल्याने ते रक्त वाढवून ते शुद्ध करते. तसेच शरीरात रक्ताचा प्रवाह योग्यरित्या कार्य करतो.

५) कर्करोग हळद असलेले दूध हे आरोग्यासाठी वरदान आहे. यात कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो.६) तणाव दररोज हळद असलेले दूध पिल्याने थकवा, आळशीपणा आणि तणाव दूर होतो. एका संशोधनानुसार हळदीचे दूध घेतल्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताजेतवाने वाटते. शरीराला विश्रांतीसोबत नंदाची भावना प्राप्त होते.

English Summary: Know these 6 amazing benefits of drinking turmeric milk Published on: 16 October 2022, 08:21 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters