1. आरोग्य सल्ला

उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व, उपवास केल्याने आपल्याला होणारे हे फायदे जाणून घ्याच

योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व, उपवास केल्याने आपल्याला होणारे हे फायदे जाणून घ्याच

उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व, उपवास केल्याने आपल्याला होणारे हे फायदे जाणून घ्याच

योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.काही जण फराळचे सेवन करून उपवास करतात तर काही लोक नऊ दिवस कडक व्रत ठेवतात. वेगेवगळ्या वैद्यकीय पद्धतीमधील माहितीनुसार,आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ पुरेसा असतो. म्हणजे उपवासाच्या निमित्ताने या नऊ दिवसांत अनावश्यक तसंच विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. पण आजारपणात उपवास करावा किंवा करू नये? कशा पद्धतीने करावा? याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा.

आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, त्याचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होत असतात; ही बाब लक्षात घ्यावी. नवरात्रीच्या दिवसांत व्रतादरम्यान सात्विक भोजन व फलाहार केल्यानं शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीरासह मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते.- उपवासादरम्यान तुमची पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असते, याचा तुम्ही अनुभव घेतला असेलच. कारण पौष्टिक-सात्विक अन्नपदार्थ, फलाहाराच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.

- पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्या पचन संस्थेची खोलवर स्वच्छता करतात. या प्रक्रियेदरम्यान नसापेशींच्या दुरुस्तीचे कार्य देखील पार पडते.- आतड्यांमधील सूज, यकृताशी संबंधित विकार-जखम, अल्सर इत्यादी समस्या नैसर्गिकरित्या ठीक होण्यास मदत मिळते.- योग्य पद्धतीने उपवास केल्यास पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.- जी लोक फिट राहण्यासाठी भरपूर कष्ट करत आहेत. त्यांनीही आहार-विहाराच्या नियमांचं पालन करून उपवास केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

- नवरात्रीचे व्रत करताना तुम्ही फलाहार, कुट्टू तसंच शिंगाड्याचे पीठ आणि साबुदाण्याचे खाद्यपदार्थ तयार करून खाऊ शकता. पण तेलकट- मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.- उपवासाचे फराळ तयार करताना अतिशय कमी प्रमाणात तेल-तुपाचा वापर करावा. कारण नवरात्रीच्या उपवासासाठी खाल्ले जाणारे बरेच पदार्थ नैसर्गिकरित्या फॅट फ्री असतात. यापासून पाककृती तयार करतानाही त्यातील मूळ गुणधर्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच यामध्ये अधिक प्रमाणात तेल- तूप किंवा तिखट गोष्टींचा समावेश करणं टाळावे.

 

Nutritionist & Dietitian

Naturopathist

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: Know the religious, spiritual significance of fasting, the benefits of fasting Published on: 09 July 2022, 05:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters