1. आरोग्य सल्ला

जनरिक औषधाबद्दलचा जाणून घ्या हा गोंधळ

मूळ औषध किंवा त्याचे नाव वापरून विविध कंपन्यांद्वारा गोळ्या, सिरप्स बनवली जातात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जनरिक औषधाबद्दलचा जाणून घ्या हा गोंधळ

जनरिक औषधाबद्दलचा जाणून घ्या हा गोंधळ

मूळ औषध किंवा त्याचे नाव वापरून विविध कंपन्यांद्वारा गोळ्या, सिरप्स बनवली जातात. काही औषध कंपन्या त्यांचं ब्रॅन्ड नेम वापरून औषधं विकतात. ब्रॅन्ड नेम नसलेली पण औषधांचा सारखाच फॉर्म्युला वापरून बनवलेल्या गोळ्या, सिरप म्हणजे जेनरिक औषधं.

जेनरिक औषधं स्वस्त म्हणजे कमी प्रभावशाली का ?

 जेनरिक औषधांबाबत लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. जेनरिक आणि ब्रॅन्डेड गोळ्यांमध्ये औषधांचा फॉर्म्युला सारखाच असतो. परंतू ब्रॅन्डेड औषधांची किंमत त्यावर होणार्‍या प्रसिद्धी, जाहिरातबाजी, टॅक्स अशा विविध घटकांमुळे वाढते. 

औषधांच्या किमतीचा त्याच्या गुणधर्माशी किंवा प्रभावीपणाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे जेनरिक औषधं स्वस्त म्हणजे कमी प्रभावी हा तुमच्या मनातील गैरसमज आजच दूर करा.

 जेनरिक औषधं स्वस्त कशी ?

                  जेनरिक औषधांसाठी जाहिरात, कर किंवा केमिस्टपर्यंत पोहचवण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च नसल्याने ब्रॅन्डेड औषधांच्या तुलनेत जेनरिक औषधं स्वस्त असतात. जर एखादी ब्रॅन्डेड पेनकिलर गोळी सुमारे 10-12 रुपये असल्यास त्याची जेनरिक औषधाची गोळी सुमारे 3-4 रूपयांची असू शकते. साधारणंपणे 30-70% किंमतीत फरक आढळू शकतो.

जेनरिक गोळ्यांचं पॅकेजिंक वेगळं असतं का ? 

                जेनरिक गोळ्या देखील इतर औषधांप्रमाणेच पॅकेज्ड असतात. त्यावर तुम्हांला बॅच डेट, एक्सपायरी डेट त्यामधील घटक यांची माहिती दिलेली असते. त्याची पडताळणी करूनच जेनरिक औषधांची निवड करता येते.

 जेनरिक औषधं केमिस्टकडे मिळतात की केवळ जेनरिक मेडीकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतात ? आरोग्य क्षेत्रातील सद्ध्याची स्थिती आणि व्यवसाय पाहता, सुमारे 95% मेडिकल स्टोअर्स ही काही डॉक्टर्स, हॉस्पिटल्स 

यांच्याशी सलग्न असतात तर इतर 5% जनरल स्टोअर्स असतात. पण जेनरिक औषधं त्यासाठी खुले करण्यात आलेल्या खास जेनरिक मेडिकल स्टोअर्स प्रमाणेच सामान्य केमिस्ट स्टोर्समध्येही उपलब्ध असू शकतात.

जेनरिक औषधं विकत घेण्यासाठी देखील डॉक्टर प्रिस्कक्रिपशन आवश्यक आहे का ? कोणतेही औषधं किंवा त्याची मात्रा स्वतः ठरवणं चूकीचे आहे. त्यामुळे जेनरिक औषधंदेखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्सनेच घेणं हितकारी आहे.

 

Nutritionist & Dietician

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 9673797495

English Summary: Jenerik medicine know about this mix doubt Published on: 28 April 2022, 07:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters