आपल्या शरीरात लोह योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. शरीरात लोह कमी असेल तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या शरीरात पुरेसे लोह नसेल तर, तुमचे शरीर रक्तपेशींमध्ये पुरेसे हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही जे त्यांना ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करत असते. परिणामी तुम्हाला दम लागणे, थकवा येणे तसेच सुस्तपणा जाणवू शकतो. शरीरात लोहाची कमतरता कशी टाळता येईल किंवा त्यावर मात कशी करता येईल यावर काही उपाययोजना आहेत.
लोहयुक्त पदार्थांचे सेवन:
तुमच्या शरीरातील लोह वाढवण्यासाठी तुम्ही भरपूर लोह असलेले पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अन्न हे आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करते त्यामुळे आपण आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये पुरवली पाहिजेत. आता पाहुयात काही लोहयुक्त पदार्थ जे तुम्हाला तुमच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे: पालक आणि इतर हिरव्या भाज्या, राजमा, वाटाणा, चिकन, मासे आणि इतर सीफूड, ड्रायफ्रूट, डार्क चॉकलेट, तसेच मसूर डाळ.
व्यायाम करताना लक्ष द्या:
सातत्याने येणाऱ्या घामामुळे अनेकदा शरीरातून लोहाची कमतरता होऊ शकते. अत्यंत तीव्र व्यायामामुळे तुमची लोह पातळी कमी होऊ शकते. जर तुम्ही वारंवार व्यायाम करत असाल तर लोह सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो.
आता नोकरीच्या मागे न धावता तरुणांच्या मनात बसणार शेती; ठाकरे सरकारची नवी योजना
व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमचे डॉक्टर तुमच्या लोहाच्या कमतरतेची तीव्रता आणि उपचारावर अवलंबून, तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम पद्धती आणि नमुना सुचवू शकतात.
विश्रांती घ्या:
सुरक्षित व्यायाम सत्राची गुरुकिल्ली म्हणजे आवश्यक विश्रांती घेणे. लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, म्हणून आवश्यक विश्रांती महत्वाची आहे.
काय सांगता! आता बकर्यांची बँक होणार सुरु; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
जीवनसत्त्वे अ आणि क समृध्द अन्न खाणे आवश्यक :
जीवनसत्त्वे समृध्द अन्न खाल्ल्याने शरीरात लोह शोषण्यास मदत होते. चांगली दृष्टी, हाडांचा विकास तसेच मजबूत रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. काही उच्च व्हिटॅमिनयुक्त पदार्थ आहेत: संत्री, लिंबू, पेरू, स्ट्रॉबेरी, हिरव्या भाज्या, ब्रोकोली,पपई .
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
Share your comments