निरोगी शरीर ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक अन्न आणि व्यायाम खूप महत्वाचा आहे. विविध पालेभाज्या, फळे आणि फळभाज्या यातून आपल्या शरीराला उपयुक्त असणारी जीवनसत्वे मिळत असतात त्यामुळे डॉक्टर आपल्याला पालेभाज्या फळे खाण्याचे सल्ले देत असतात.
काही वेळा डॉक्टर आपल्याला ब्राऊन शुगर आणि ब्राऊन ब्रेड खाण्याचा सल्ला देतात यामागे सुद्धा अनेक फायदे आहेत.
ब्राऊन शुगर अनेक आजार रोखण्यास फायदेशीर:
पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर आपल्या शरीरास खूप फायदेशीर असते. आपण आपल्या दैनंदिनी जीवनात आणि आहारात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो. जास्त प्रमाणात गोड खाणे म्हणजे विविध आजारानं आमंत्रण देणे असे आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे आपल्याला स्थूलत्व हृदयरोग टाइप-2 डायबेटीस यकृताशी संबंधित आजार यांसारखे आजार होऊ शकतात. जर का आपण आपल्या आहारात पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर चा वापर केल्यास या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा आपल्याला ब्राऊन शुगर, ब्राऊन राइस, आणि ब्रेड खाण्याचे सल्ले देतात.
हेही वाचा:रात्री झोपेत जास्त घाम येण्याची ही असू शकतात कारणे,जाणून घ्या
ब्राऊन शुगर मधे अनेक पोषक घटक असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. ब्राऊन शुगर मध्ये मिनरल , कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, कार्बोहायड्रेट्स हे पौष्टिक घटक सापडतात. तसेच ब्राऊन शुगर मध्ये फॅट्स, कोलेस्टेरॉल, प्रोटीन अजिबात सापडत नसल्यामुळे ते आपल्या शरीराला उपयुक्त ठरते.
ब्राउन शुगरचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत ब्राऊन शुगर मध्ये कॅलरीज चे प्रमाण कमी असते. तसेच ब्राऊन शुगर मधे मोलासेस नावाचा घटक असतो. यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते. यात अनेक सूक्ष्म पोषक घटक सुध्दा असतात, ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत देखील होते. ब्राउन शुगर एक साधारण कार्बोहायड्रेट असतं. ते लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे कमी वेळात शारीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते.
हेही वाचा:चक्क नारळाच्या करवंट्यांला बाजारात प्रचंड मागणी का वाढतेय? काय आहे यामागील सत्य
अन्न पचण्यासाठी उत्तम तसेच बद्धकोष्ठतेवर प्रभावी असलेली ब्राउन शुगर आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. ब्राऊन शुगर चे सेवन केल्यास पचनाशी संबंधित असलेले सर्व आजार नाहीसे होतात तसेच ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेशी सारख्या समस्या आहेत त्यांनी आपल्या आहारात ब्राउन शुगरचं सेवन करणे खूप गरजेचे आहे. महिलांनी मासिक पाळी येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी जर ब्राउन शुगरचे सेवन केले तर पोटदुखी, क्रॅम्पपासून यापासून सुटका मिळते. तसेच ब्राऊन शुगर चे सेवन केल्यामुळे आपली त्वचा उजळून आणि टवटवीत दिसते तसेच चेहऱ्यावरील डेड सेल नाहीश्या होतात तसेच अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो. तसेच आजारी असताना आपल्या शरीरातील रोग्रतिकारक शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते म्हणून शरीरास पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर फायदेशर आहे.
Share your comments