
दररोजच्या आहारात तिळाचा समावेश करा ‘हे’ फायदे होतील !
तसेच तीळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तीळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात.हाडांसाठी फायदेशीर– तीळामध्ये विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्ये पोषक घटक असतात. ही खनिजे नवीन हाडे तयार करण्यात आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तीळ भाजून किंवा कच्चे देखील खाल्ले जातात.
तीळात अँटीऑक्सिडेंट नावाचे घटक असतात. जे बर्याच रोगांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. उच्च कोलेस्ट्रॉल– एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमितपणे तीळ खाल्यास खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. उच्च रक्तदाब– तीळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की, तिळात लिग्निन, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडेंट्ससारखे अनेक घटक आढळतात.
Share your comments