निरोगी आरोग्य आजच्या घडीला खूप महत्वाचे आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नियमित पौष्टिक आहार आणि व्यायाम योगासने करणे गरजेचे आहे याच बरोबर काही सवयी सुद्धा बदलले पाहिजेत. बदलत्या जीवनशैली मुळे अनेक आजारांची लागण होताना आपल्याला दिसते तसेच दिवसेंदिवस हे आजार वाढतच चालले आहे.
पल्मोनरी एडिमा म्हणजेच छातीत किंवा फुप्फुसांमध्ये पाणी भरणे होय. हा एक भयंकर आजार आहे जर का योग्य वेळी याकडे लक्ष न दिल्यास हा आजार आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. छातीमध्ये पाणी भरल्यावर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो शिवाय अन्ननलिकेत सुद्धा पाणी साचून त्रास वाढतो. तर चला मित्रांनो आज आपण या लेखात या आजाराची काही लक्षणे जाणून घेऊयात.
फुप्फुसात पाणी भरण्याची कारणे?
फुप्फुसात पाणी भरण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे हृदयरोग होय. परंतु इतर वेळी वेगवेगळ्या कारणांनी सुद्धा फुप्फुसात पाणी भरतं. निमोनिया, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे, काही औषधं, छातीवर आघात होणे आणि उंचावर चढणे किंवा एक्सरसाइज करतानाही फुप्फुसात पाणी जाऊ शकतं.फुप्फुासात पाणी भरण्याच्या स्थितीला मेडिकल इमरजन्सी मानलं गेलं आहे. जर पाणी भरल्यावर जलद उपचार नाही केला तर मृत्यूही ओढवू शकतो.
पाणी भरल्यावर ही लक्षणे आढळून येतात:-
फुप्फुसात पाणी भरल्यावर मानवी जीवनात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात यामधे श्वास घेण्यास त्रास होतो, कफमधून रक्त येणे, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा थंड आणि कोरडी होणे. थकवा, धाप लागणे, अस्वस्थता, चिंता, पाय आणि शरीराच्या इतर भागावर सूज येणे ही वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.
इतर लक्षणे:-
- खोकला
- जास्त घाम येणे
- चिंता व अस्वस्थता
- घाबरल्यासारखं वाटणे
- त्वचा पिवळी पडणे
- श्वास घेताना अडचण
- हृदयाचे ठोके वाढणे
- छातीत दुखणे
- सपाट झोपल्यावर श्वास घेण्यास अडचण
- पायांवर सूज
हेही वाचा:-दुधासोबत करा या पदार्थाचे सेवन, वजन होईल झटपट कमी, वाचा सविस्तर
उपाय:-
जर तुम्हाला यातून ब्रे व्हायचे असेल तर तुम्हाला. आहारामध्ये पौष्टिक पदार्थाचे सेवन केले पाहिजे आहारामध्ये दूध, अंडी, मटण, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश केला पाहिजे त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि गोगासाने करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर सोडियम चे सेवन कमी प्रमाणात करा म्हणजेच आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. तसेच मिठाच्या ऐवजी काळे मिरे, लसूण, लिंबाचा रस याचा वापर करावा. तसेच स्मोकिंग आणि मद्यपान याचे सेवन पूर्णपणे टाळावे. तसेच या काळात जास्त फिजिकल कृती करू नका. हे उपाय खूप फायदेशीर आणि गरजेचे आहे.
Share your comments