गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाचा रोगी प्रत्येक वैद्यक शाखेतील उपचार करून घेण्याच्या मागे लागतो. आयुर्वेदात काही औषध आहे का, असे विचारत अनेक मधुमेहाचे रुग्ण वैद्यांकडे येतात. ते भलीमोठी तपासण्यांच्या फाईल घेऊनच. अमुक महिन्यांपासून रक्तातील साखर एवढी आहे. त्याचप्रमाणे लघवीवाटे या प्रमाणात साखर जाते आहे... मग आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय? मधुमेहासंदर्भात अर्थातच
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये इतर रोगांप्रमाणे मधुमेहाचेही सविस्तर वर्णन सापडते. त्याची कारणे, लक्षणे तसेच चिकित्सेबद्दलचे केलेले मार्गदर्शन अगोदर बघणे उचित ठरेल आणि नंतर उपचार करायला सोपे होईल.
मूळात ‘मधुमेह’ हा रोग मत्राशी संबंधित असा आयुर्वेदाने वर्णिलेला आहे. मूत्राला या रोगामध्ये माधुर्य येते आणि मूत्रप्रवृत्ती अनेकवेळा आणि मोठय़ा प्रमाणात होते. प्रमेह या रोगात मूत्राच्या स्वरूपात आणि प्रमाणात वाढ होते. तसेच मूत्राच्या स्वरूपात बदल होतो.
मूत्रप्रवृत्ती जी स्वच्छ हवी, ती होत नाही. निरनिराळ्या स्वरूपात ती होते आणि त्या स्वरूपानुसार प्रमेहाचे एकूण २० प्रकार आयुर्वेदाने वर्णन केले आहेत.
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार प्रकार आहेत.
कफदोषामुळे होणारे दहा प्रकार
पित्तदोषामुळे होणारे सहा प्रकार
वातदोषामुळे होणारे चार प्रकार
मधुमेह हा प्रकार वातदोषामुळे होणाऱ्या प्रमेहाच्या चार प्रकारांपैकी एक आहे.
म्हणजे मधुमेहाच्या रोग्यास वात दोष संतुलित करावा लागेल, आता हे सांगा आपल्याला कधी कोणी याबद्दल बोलले का? की फक्त आयुष्य भर गोळ्या खा, एवढंच सल्ला दिला. माझं म्हणणं गोळ्या बंद करा अस नाही, कारण जो पर्यत आजार संपत नाही तो पर्यत तरी आपण डॉ. सांगितलेली औषध मन मर्जीने बंद करू नये. परंतु आयुष्य भर गोळ्या खा अस सांगणाऱ्या डॉक्टर कडे जाणे मात्र बंद करावे व योग्य वैद्य किंवा डॉक्टर पहावा.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Share your comments