पावसाळ्याच्या ऋतूमध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच मसालेदार पदार्थ खायला आवडतात त्यातील एक म्हणजे मक्याचे कणीस किंवा मक्याचे मसालेदार आंबट तिखट चवीला लागणारे दाणे.बऱ्याच वेळा आपण फिरायला गेल्यावर अनेक ठिकाणी मक्याचे कणीस विकायला अनेक लोक बसलेले असतात. आणि अनेक पर्यटक लोक चवीने खातात सुद्धा.
तर चला तर मित्रानो आज आपण मक्याचे कणीस खाल्ल्यावर आपल्या शरीरास ते कसे फायदेशीर आणि मक्याचे कणीस खाल्ल्यावर कोणते कोणते फायदे होतात या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
मक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरास होणारे फायदे:-
डोळ्यांसाठी फायदेशीर:- मक्याचे कणीस खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहते तसेच डोळ्या संबंधित असलेले आजार नाहीसे होतात. तसेच ग्लुकोमा आणि मोतिबिंदू या सारख्या बड्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
हेही वाचा:वांगे आहे आरोग्यासाठी फायदेशीर;जाणून घ्या वांगे खाण्याचे फायदे
हाडांसाठी उपयुक्त:- मक्याच्या कंसात नैसर्गिक कॅल्शियम असतात आणि ते आपल्या हाडांसाठी खूप उपयोग असतात.
ब्लड शुगर नियंत्रणात राहते:- कणीस मधील कार्बोहायड्रेट शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देत असतात. तसेच पचनशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात राहते.
हृदयासाठी उपयुक्त:- मक्यात कोलेस्टेरॉल आणि सोडियम चे प्रमाण अजिबात नसते त्यामुळे हृदय आजार असणाऱ्या लोकांनी मक्याचे सेवन करणे फायदेशीर आहे
पोटाच्या विकारांपासून सुटका:- पोटात दुखणे, पोट साफ न होणे, पचन न होणे पोट फुगणे या सारख्या आजारांपासून कायमची सुटका मिळते.
ऍनिमिया चा त्रास कमी होणे:- आयर्न च्या कमी पणामुळे शरीराला येणारा थकवा कमी होतो तसेच रक्तातील हिमग्लोबिन चे प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणात वाढते.अश्या प्रकारे आपल्या रानात पिकणाऱ्या पिक्याच्या कणसाचे मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच बाजारात सुद्धा याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Share your comments