हिरव्या गवतासारखे दिसणारे गव्हांकुर यालाच व्हीटग्रास असेही म्हणले जाते. गव्हांकुर हे प्राचीन काळापासून त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. गव्हांकुरांवरील संशोधन व त्यांना जगविख्यात करण्याचे श्रेय हे आताच्या आधुनिक काळात डॉ. एन विगमोर, बोस्टन, अमेरिका यांना जाते. गव्हांकुराला पूर्ण अन्न असेही म्हणतात कारण गव्हांकुरात अत्यावश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात अढळतात.
जेव्हा गव्हाचे बी चांगल्या सुपीक जमिनीत पेरले असता, तेव्हा ते काही दिवसांत उगवायला सुरू होते आणि त्याच बरोबर त्याला पाने हि लागतात. उगवल्यानंतर जेव्हा पाच ते सहा पाने लागतात, तेव्हा अंकुरलेले बीजाचे हे भाग गव्हांकुर म्हणून संबोधले जात. औषधी विज्ञानानुसार याचे उपयुक्त असे फायदे आहेत. गव्हांकुराच्या रसात कर्करोग सारख्या अनेक रोगांपासून संघर्ष करण्याची क्षमता आहे. डॉ. एन विगमोर यांच्या नुसार गव्हांकुर हे सर्वश्रेष्ठ गवत असून त्यापासून मनुष्याला अत्यावश्यक अशी सर्व पोषकतत्वे मिळतात. उत्तम प्रतिच्या 23 किलो पालेभाज्यांमधून जेवढे पोषक द्रव्ये मिळतील तेवढे घटक एक किलो गव्हांकुरांमधून प्राप्त होतात.
हेही वाचा:ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे
गव्हांकुराची पोषकतत्वे:
व्हीटग्रास हे प्रथिने व पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे, आणि फायबर, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व ई (अल्फा टोकोफेरॉल), जीवनसत्त्व क, थायमिन, रिबोफॅव्हव्हिन, नियासिन, जीवनसत्त्व बी 6, जीवनसत्त्व बी 5, लोह, झिंक, कॉपर, मॅगनीज आणि सेलेनियम यांचाही उत्तम स्त्रोत आहे.
क्र. |
पोषकतत्वे |
प्रमाण |
1 |
उर्जा |
21 कॅलरी |
2 |
पाणी |
95 ग्रॅम |
3 |
कर्बोदके |
2.0 ग्रॅम |
4 |
मेद |
0.06 ग्रॅम |
5 |
क्लोरोफील |
42.2 मिली ग्रॅम |
6 |
ग्लुकोज |
0.8 मिली ग्रॅम |
व्हीटग्रास पासून पावडर:
- व्हीटग्रास पावडर तयार करण्यासाठी 6-8 इंच वाढलेल्या ग्व्हांकुराची निवड करावी.
- काढणी नंतरुन व्हीटग्रास हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत जेणेकरून धुलीकण व मातीचे कण त्यावर राहणार नाहीत.
- व्हीटग्रास म्हणजेच गव्हांकुर हे सावलीत कोरड्या स्वच्छ कापडाखाली सात ते आठ दिवस ठेवावेत.
- वाळवलेले गवत ग्राइंडर मध्ये बारीक करून त्याची पावडर बनवावी आणि हवाबंद डब्यात ठेवावी.
गव्हांकुर (व्हीटग्रास) ही आयुर्वेदिक काळापासून चालत येणारी एक औषधी वनस्पती आहे. व्हीटग्रास शेडमध्ये वळीवला असता त्यापासून उत्तम प्रतीची पावडर बनवता येते शेडमध्ये वाळवलेल्या व्हीटग्रास पावडर मध्ये खालील प्रमाणे पोषकतत्त्वे आढळतात.
क्र. |
पोषकत्त्व |
प्रमाण |
1 |
पाणी |
11.4% |
2 |
प्रथिने |
22.4 ग्रॅम |
3 |
तंतुमय पदार्थ |
22.1 ग्रॅम |
4 |
मेद |
1.9% |
5 |
कर्बोदके |
42.2% |
6 |
उर्जा |
275.9 कॅलरी /100 ग्रॅम |
7 |
खनिजे |
5.5% |
व्हीटग्रास पावडर मधील खनिजांचे व ऑक्झलीक एसिडचे प्रमाण:
क्र |
पोषकत्त्व |
प्रमाण |
1 |
कॅलशियम |
186.6 मिली ग्रा./ 100 ग्रॅम |
2 |
फॉसफरस |
60.23 मिली ग्रा./ 100 ग्रॅम |
3 |
आयर्न |
17.6% |
5 |
ऑक्झलीक एसिड |
47.3% |
वरील पोषकतत्त्वे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील अन्नतंत्र महाविद्यालय परभणी येथील प्रयोगशाळेत पडताळण्यात आली आहेत. वरील दिलेले पोषकतत्वे व त्यांचे प्रमाण यावरून असा अनुमान लावण्यात येतो की व्हीटग्रास पावडर ही लोह, कॅल्शियम यांचा उत्तम स्रोत आहे तसेच यात तंतुमय पदार्थ, खनिजे यांचाही उत्तम स्रोत असल्याकारणाने व्हीटग्रास पावडर ही रक्तासंभदीत होणारे आजार (खनिजांच्या अभावामुळे होणारे), अपचन यांसारखे आजार दूर होण्यास मदत होते. व्हीटग्रास पावडर मधील वैदकीय मुल्ये आणि आरोग्यदायक फायद्यांमुळे आरोग्यासंबधित समस्यांकरिता शिफारस करण्यात येते.
व्हीटग्रास ज्यूस:
व्हीटग्रास ज्यूस हे आजकाल सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा रस उपभोगल्यास आपल्याला आपल्या बऱ्याच कमकुवत रोगांवर मात करण्यास मदत होते. कारण त्यात बरेच पोष्टिकगुण, जीवनसत्त्वे व एँँटीऑक्सिडंट आहे. व्हीटग्रास ज्यूस हे उर्जा प्रदान करण्यासाठी ओळखले जाते. तसेच शरीरातील रोगप्रतीकारक शक्तीचा विकास घडवून आणते. हे आपल्या शरीरातील घातक सूक्ष्मजीव काढून टाकण्यास मदत करते.
मोहम्मद शरीफ, शैलेश वीर, क्षीरसागर आर. बी व शिंदे एकनाथ
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविदयालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Share your comments