गहू गवताचा रस आरोग्याला फायदेशीर

02 August 2019 10:09 AM


गव्हाला शास्त्रीय भाषेत Triticum aestivum असेही म्हटले जाते. गहू गवतला दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी मध्ये wheat grass (गव्हाचे गवत) असेही संबोधले जाते. गहू गवत हे पावडर व रस या दोन रूपात मिळते आपण या लेखामध्ये गहू गवताचा रस कसा बनवला जातो आणि त्याचे आपल्या आरोग्यावर कसे परिणाम होतात याविषयाची माहिती देणार आहोत.

गहू गवताची लागवड कशी करतात?

 • गव्हाची लागवड घरात कुंडी मध्ये करावी.
 • स्वच्छ किडमूक्त्त आणि भरलेल्या गव्हाच्या बियांची निवड करावी.
 • त्या नंतर या निवडलेल्या बियांना पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवावे.
 • दुसर्‍या दिवशी जास्त असलेले पाणी काढून टाकावे.
 • त्या उरलेल्या बियांची पेरणी करावी.
 • बियांची 8-14 दिवस व्यवस्थित मशागत करावी.
 • गवताची उंची 7 इंच झाल्यानंतर पहाटे 3-4 च्या वेळेतच त्याची कापणी करावी.

टीप: गहू गवतामध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidants) असतात आणि ते सूर्यप्रकाशाला सवेदनशील असतात त्यामुळे त्याची कापणी पहाटे केली जाते.

गहू गवतचा रस बनवण्याची पद्धत:

 • 7 इंच वाढलेल्या गवताची कापणी करून त्याला बारीक तुकड्यामध्ये कापावे आणि गरजेनुसार पाणी टाकून ग्राइंडर मिक्सर मधून काढून मऊ आणि बारीक पेस्ट करावी.
 • त्या मिश्रणाला एक-दोन वेळेस गाळणीने गाळून रस बाजूला काढून घ्यावा.
 • या बनविलेल्या रसाचे पुरेपूर फायदे घेण्यासाठी त्वरित काहीही न खाता पहाटेच सेवन करावे.
 • या बनविलेल्या रसाची चव वाढवण्यासाठी चवीनुसार साखर आणि लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करावे.

(डायबेटिस मेलीटीसने ग्रस्त असलेल्या रोग्यांनी साखर न वापरता फक्त लिंबाचा रस वापरावा)

पौष्टिक घटक:

 • प्रथिने- 860 मिग्रॅ
 • B- कॅरोटीन- 920 IU
 • विटामीन E- 880 MCG
 • विटामीन C- 9 मिग्रॅ
 • विटामीन B 12- 0.30 MCG
 • फॉस्फरस- 29 मिग्रॅ
 • मॅग्नेशिअम- 8 मिग्रॅ
 • कॅल्शियम- 7.2 मिग्रॅ
 • लोह- 0.66 मिग्रॅ
 • पोटॅशियम- 42 मिग्रॅ

(हे घटक इनडोअर पेरणी केलेल्या गव्हाचे आहेत)

आरोग्यदायी फायदे:

 • हा रस डायबेटीस, मेलीटीस असलेल्या रुग्णासाठी खुप फायदेशीर आहे.
 • रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे.
 • या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन रोकण्यासाठी होतो.
 • त्यामुळे रक्ताचे आजार उद्भभवत नाहीत.

दुष्पपरिणाम:

 • या रसाचे सेवन दुसर्‍या अन्नासोबत केल्यास मळमळ होण्याची शक्यता आहे.
 • या रसाचे त्वरित सेवन न केल्यावर (खुप वेळ ठेवून सेवन केल्यावर) टॉक्झिन्स निर्माण होऊन डोकेदुखी व मळमळ होऊन चक्कर येण्याची शक्यता आहे.

लेखक: 
प्रा. देशमुख एस. एच.

सहाय्यक प्राध्यापिका
क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च फाऊंडेशन, औरंगाबाद
9763333574

wheat wheat grass गव्हांकुर गहू गवत गहू Triticum aestivum Antioxidants अँटीऑक्सिडंट B-carotene बीटा कॅरोटीन
English Summary: Importance of Wheat Grass in Human Health

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.