1. आरोग्य

रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

KJ Staff
KJ Staff
sweet potato

sweet potato

महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आपण रताळे जास्त प्रमाणामध्ये खातो. मात्र, गोड बटाटा (स्वीट पोटॅटो) म्हणून जगभर ओळख जात असलेले एक गोड कंदमूळ आहे. रताळं हे आपण बहुधा उपवासासाठी वापरतो. बटाट्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असलेलं हे कंदमूळ भरपूर स्टार्चने युक्त असून शरीराला ताबडतोब ऊर्जा देण्याचं काम करतं.

रताळ्याचा गर पांढरा, पिवळट रंगाचा असतो, तर काही रताळी आतून केशरी रंगाची असतात. रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असतं. केशरी रताळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असतं. त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत. रताळी भाजून, उकडून खावी, गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे ती चविष्टच लागतात.

हेही वाचा :रताळ्याचे आकरा फायदे; रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे फायदेशीर

रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. जातीनिहाय काही रताळे पांढरे, काही केशरी तर काही पिवळट रंगाचेही असतात. मात्र, बाजारात ही कंदमुळे खरेदी करताना चांगली पाहून घ्यावीत. अनेकदा खोडून काढताना मार लागून किंवा जमिनीतील कीटकांच्या किडीमुळे हे कडू चवही देतात. कडू भाग काढून आपण हा पदार्थ सहजतेने खाऊ शकतो.

आरोग्यदायी फायदे:

 • रताळे यामध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील प्रोटिझ इनहिबिटर हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता या प्रथिनेमध्ये असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे.
 • रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.
 • रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपणही जास्त उद्भवत नाही.
 • रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.
 • यातील जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.
 • रताळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवत नाही. सोबतच याचाच फायदा वजन आटोक्यात आणण्यासाठी होती. या गुणधर्मामुळे रताळे मधुमेहच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते
 • वजन वाढण्यात अन्नातल्या उर्जा (कॅलरीज) चा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी १०० ग्राम मागे फक्त ८६ एवढं कमी असतं.
 • रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गुणधर्मामुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होत नाही. निर्जलीकरणमुळे चयापचय क्रियेवर होणारा दुष्परिणाम टाळला जातो.
 • रताळे मध्ये लोहाचा स्रोत जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे खाणाऱ्यांची हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
 • रताळ्यात पिष्टमय पदार्थाचा प्रकार हा घटक असतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी करण्याचं काम करतो. सोबतच तयार होणाऱ्या नवीन मेदावारही नियंत्रण आणतो.
 • रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.

लेखक:
सुग्रीव शिंदे, डॉ. अरविंद सावते
पी एच डी स्कॉलर
अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
८९७५३९९४९१

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters