1. आरोग्य सल्ला

वाचा! रताळ्याचे आकरा फायदे; रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे फायदेशीर

भारतीय आहारामध्ये कडधान्य, डाळी यांच्यासोबतच कंदमुळे हा देखील तितकाच आरोग्यदायी महत्त्व आहे. त्यामुळे भारतीय किचनमध्ये बीट, रताळे, मुळा यांचा वापर सर्रास पाहायला मिळतो. आता या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे.

KJ Staff
KJ Staff


भारतीय आहारामध्ये कडधान्य, डाळी यांच्यासोबतच कंदमुळे हा देखील तितकाच आरोग्यदायी महत्त्व आहे. त्यामुळे भारतीय किचनमध्ये बीट, रताळे, मुळा यांचा वापर सर्रास पाहायला मिळतो. आता या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. परंतु रताळ्याविषयी पाहिजे तेवढी माहिती नाही. आपल्याकडे साधारणपणे बटाट्याला पर्याय म्हणून उपासाला रताळ्याकडे पाहिले जातात. रताळे भाजून किंवा तुपात परतून खाल्ले जातात. उपवासा व्यतिरिक्त याचे अनेक फायदे आहेत तेही आरोग्यदायी. त्याची माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.

      रताळ्याचे ११ आरोग्यदायी फायदे

  • उन्हामुळे किंवा अतिउष्णतेमुळे शरीराचे दाह होत असेल तर रताळे उकडून खावे.
  • लघवी करण्याच्या वेळेस अडथळा उत्पन्न होत असेल तर रताळे खावे.
  • वारंवार भूक लागत असल्यास रताळे खावे. रताळ यामुळे भूक लवकर लागत नाही.
  • जर एखाद्या कारणामुळे शरीरावर सूज येत असल्यास रताळ्याचे काप करून ते तुपावर परतून खावे.
  • बारीक व्यक्तीने रताळी खाणे फायदेशीर असते.
  • रताळ्यामध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याने अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील प्रोटीझ इनहिबिटर हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता या प्रथिनांमध्ये असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे.
  • रताळ्यामध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
  • रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्त्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपण ही जास्त उद्भवत नाही.
  • रताळ्याच्या केसरी आवरणामध्ये बीटा कॅरोटीन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसेच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.
  • यातील जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही कॅल्शियममुळे हाडांना मजबुती मिळते.
  • रताळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवत नाही. याचाच फायदा वजन आटोक्यात आणण्यासाठी होतो. या गुणधर्मामुळे रताळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते.

 या शारीरिक तक्रारींमध्ये रताळे खाणे टाळावे. पोटामध्ये गॅसची समस्या वारंवार होत असेल तर रताळे खाऊ नये.

 

English Summary: The benefits of sweet potato; It is beneficial to control blood pressure Published on: 31 October 2020, 05:42 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters