1. आरोग्य सल्ला

Health Tips : काळी मिरी आणि लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचा ; बसेल आश्चर्याचा धक्का

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात, जे स्वयंपाकाची चव तर वाढवतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Health Benifits) मानले जातात. काळी मिरी आणि लवंग अशाच मसाल्यापदार्थापैकी आहेत. काळी मिरी आणि लवंगाचे सेवन केले तर याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
clove health benifits

clove health benifits

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात, जे स्वयंपाकाची चव तर वाढवतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Health Benifits) मानले जातात. काळी मिरी आणि लवंग अशाच मसाल्यापदार्थापैकी आहेत. काळी मिरी आणि लवंगाचे सेवन केले तर याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

कारण हे दोन्ही मसाले औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यामुळे या मसाल्यांचे एकत्र सेवन केल्याने अनेक आजारही दूर होतात.  कारण काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6, थायामिन, नियासिन, सोडियम, पोटॅशियम असे गुणधर्म असतात. 

त्याच वेळी, लवंगमध्ये व्हिटॅमिन-बी1, बी2, बी4, बी6, बी9 आणि व्हिटॅमिन-सी, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन-के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर सारखे घटक असतात. जे की निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. चला तर मग जाणून घेऊया काळी मिरी आणि लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

हेही वाचा : Health Tips : उन्हाळ्यातच काकडी का खावी? वाचा याविषयी सविस्तर

लठ्ठपणा कमी होण्यास मदत करते : आजकाल बहुतेक लोक वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाले आहेत, परंतु जर तुम्ही काळी मिरी आणि लवंग एकत्रपणे सेवन केले तर वजन कमी केले जाऊ शकते असा दावा आयुर्वेदात केला गेला आहे.  यासाठी तुम्ही काळी मिरी आणि लवंगच्या पाण्याचे सेवन करू शकता.

हेही वाचा : सावधान! जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका; नाहीतर, भोगावे लागतील हे गंभीर परिणाम

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास रामबाण : काळी मिरी आणि लवंग यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन गुणधर्म असतात, त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनला सहजपने टाळू शकता आणि यामुळे सहाजिकच आपण निरोगी राहाल.

विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकते : काळी मिरी आणि लवंगाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकले जातात. यामुळे मानवी आरोग्य अबाधित राहते. यासाठी काळी मिरी आणि लवंग यांचे पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

सर्दी आणि फ्लूच्या तक्रारी दूर होतात : सर्दीची समस्या असल्यास काळी मिरी आणि लवंगाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण की, काळी मिरी आणि लवंगमध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे सर्दीपासून दुर ठेवण्यास मदत करतात. यासाठी काळी मिरी आणि लवंग चावून खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला गेला आहे.

हेही वाचा : Watermelon Health Benifits: 'या'मुळे टरबूज खाण्याचा दिला जातो सल्ला; याचे फायदे वाचून तुम्हीही अवश्य खाणार टरबूज

त्वचेसाठी फायदेशीर : काळी मिरी आणि लवंग त्वचेसाठी खुपच फायदेशीर मानली जाते. असे सांगितले जाते की, काळी मिरी आणि लवंगाचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

हेही वाचा : महागड्या यंत्रांशिवाय घरच्या घरी तयार करा चवदार पनीर

English Summary: Health Tips: Read about the amazing benefits of eating black pepper and cloves; Basel shocked Published on: 25 April 2022, 01:20 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters