1. आरोग्य सल्ला

Health Tips: कुळीथ अथवा हुलगा खाण्याचे जबरदस्त फायदे; जाणुन तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

कुळीथ अथवा हुलगा डाळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते, याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत होते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Kulith Benifits

Kulith Benifits

कुळीथ अथवा हुलगा डाळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते, याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत होते.

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, कुलथी डाळीचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहे. त्यामुळे आजपासूनच कुळीथ आपल्या रोजच्या आहारात समावेश करा, जेणेकरून आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घ्या रोजच्या रोज कुळीथ डाळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

मुतखड्याची समस्या दूर करण्यासाठी : कुळीथ डाळीचे दररोज सेवन केल्याने मुतखड्याची समस्या दूर होते, त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी मुबलक प्रमाणात आढळते, तर ते शरीरातील दुर्गधीची समस्या दूर करण्यास देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. कुळीथ रोज सेवन केल्याने मुतखडा लघवीद्वारे निघण्यास मदत होतं असते.

मधुमेहाची समस्या दूर करते: एखादा मधुमेहाचा रुग्ण असेल आणि त्याला त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर कुळीथ डाळीचे सेवन करणे त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे, यामध्ये व्हिटॅमिनसह प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर तुम्ही त्याचा आहारात संध्याकाळी स्नॅक म्हणून देखील समावेश करू शकता, कारण हुलगा खूप आरोग्यदायी आहे. 

वजन कमी करण्यास मदत करते: जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कुळीथ डाळीचे सेवन करणे तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरू शकते, वजन कमी करण्यासाठी कुळीथ खूप फायदेशीर मानले जाते, यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर फक्त कुळीथ खाऊ नका, तर तुम्ही कुळीथच्या सूपचा देखील आहारात समावेश करू शकता.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास सक्षम: जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचं असेल, तर कुळीथ डाळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते, त्यात हायपोकोलेस्टेरोलेमिक नावाचा घटक आढळतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्याच वेळी, यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. या आधारावर असे म्हणता येईल की, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही रोजच्या आहारात कुलथीच्या डाळीचा समावेश करू शकता.

English Summary: Health Tips: Great benefits of eating Kulith or Hulga; Knowingly you will also say, wow what a thing! Published on: 15 May 2022, 10:26 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters