1. आरोग्य सल्ला

Health Tips : तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग सावध व्हा! आजच ही वाईट सवय सोडा, नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
drinking water habits

drinking water habits

Health Tips : मित्रांनो पाणी (Water) हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे आणि तहान शमवण्यासाठी पाण्यापेक्षा (Drinking Water) चांगला पर्याय नाही. चांगल्या आरोग्यासाठी (Human Health) दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात, मात्र फक्त पाणी पिणेच पुरेसे नाही, तर आपण पाणी कसे पितो (Drinking Water Tips) हेही खूप महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक उभे राहून पाणी पितात.

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि घाईघाईत लोक उभे राहून पाणी पितात (Water Drinking Habits) किंवा थेट बाटलीतूनच पाणी पितात, पण उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना कुठेतरी आमंत्रण देतो.

ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. त्यामुळे ही सवय आजच सोडलेली बरी. मित्रांनो आज आम्ही उभे राहून पाणी पिल्याने कोणत्या आजारांना सामोरे जावे लागू शकते याविषयी सांगणार आहोत.

ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो

जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. याशिवाय अन्न आणि श्वसनाच्या नळ्यांमधील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्याचा वाईट परिणाम केवळ फुफ्फुसावरच नाही तर हृदयावरही होतो.  उभे राहून पाणी प्यायल्याने पोटातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटाच्या खालच्या भिंतींवर दाब निर्माण होतो आणि अशा स्थितीत लोक हर्नियाचे शिकार होतात.

तणाव वाढतो

उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताण वाढतो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही सवय देखील तणाव वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिण्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि अशा स्थितीत पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी होतात. याच कारणामुळे या सवयीमुळे शरीराला तणावाचा सामना करावा लागतो.

सांधेदुखीचेही कारण आहे

उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात, असे तुम्ही वडिलांकडून अनेकदा ऐकले असेल. हे अगदी खरे आहे. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांवर दाब पडतो, त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. उभं राहून पाणी पिण्यानेही तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

खरं तर, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातून पाण्याचा प्रवाह वेगाने सांध्यांमध्ये जमा होतो आणि हाडे आणि सांध्यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे हाडांच्या सांध्याच्या भागात द्रवपदार्थाची कमतरता भासते आणि सांधेदुखीसह हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे लोकांना सांधेदुखीसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

मूत्रपिंड वर विपरीत प्रभाव

उभे राहून पाणी पिण्याच्या या सवयीचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती उभं राहून पाणी पिते तेव्हा ते पाणी गाळल्याशिवाय पोटाच्या खालच्या बाजूकडे जाते आणि पाण्याची अशुद्धता पित्ताशयात जमा होते. ही स्थिती मूत्रपिंडासाठी अत्यंत हानिकारक आहे.

English Summary: health tips drinking water habits Published on: 21 September 2022, 05:56 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters