नवी मुंबई: सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या गरम हवामानात प्रत्येकाला खाणे-पिणे खूप आवडते. या हवामानात शरीर थंड राहण्यासाठी अनेक जन थंड पेय पितात. या ऋतूत बाजारात लोक थंड पेय मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.
तसेच जेवणात देखील थंडच पदार्थ अधिक सेवन करतात, या पदार्थापैकी एक आहे दही. खरं पाहता, उन्हाळ्यात दहीचे सेवन केले पाहिजे, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील आहे. मित्रांनो पण अनेक वेळा लोक अशा काही गोष्टींसोबत दह्याचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतं असतो.
चुकीच्या गोष्टीसोबत दही खाल्ल्याने लोकांना दही पचायला जड जाते. म्हणुन आज आपण कोणत्या पदार्थांसोबत दह्याचे सेवन करू नये याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता तर जाणून घेऊया याविषयी.
Health Tips: कुळीथ अथवा हुलगा खाण्याचे जबरदस्त फायदे; जाणुन तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!
आंब्यासोबत दही
मित्रांनो खरे पाहता आंबा खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे. मात्र, आंबा आणि दही यांचे एकत्रित सेवन आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे आंबा आणि दहीचे एकत्र सेवन करू नये असा सल्ला आरोग्य तज्ञ नेहमीच देत असतात.
या दोघांचे मिश्रण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सांगितले जाते. जे लोक दही आणि आंब्याचे सेवन करतात त्यांच्या शरीरात याच्या सेवनाने विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे शरीर तसेच त्वचा खराब होऊ शकते. यामुळे आंबा आणि दही एकत्रपणे खाऊ नये. आंबा आणि दही खायाचे असल्यास आपण एकत्रित न खाता वेगवेगळे खावे असा सल्ला दिला जातो.
केळी आणि दही एकत्रित खाऊ नये
आजकाल लोक मॅगी चहाचे सेवन करतात आणि या गोष्टी आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाहीत. यासोबतच अनेक लोक चवीसाठी केळी आणि दही सोबत खातात, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे आरोग्य अबाधित राखायचे असेल, तर तुम्ही केळीचे आणि दुधाचे सेवन करू शकता, त्याचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे केळी आणि दही एकत्र खाऊ नये असा सल्ला आरोग्य तज्ञ देत असतात.
Share your comments