1. आरोग्य सल्ला

Health Tips! आरोग्यासाठी काळे द्राक्ष फायद्याचे का हिरवे द्राक्ष? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का मग जाणुन घ्या याच उत्तर

आपण आपल्या आहारात नेहमीच फळांचा समावेश करत असतो. अशाच फळांपैकी एक आहे द्राक्ष, द्राक्षामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात. असे असले तरी, काळे द्राक्ष आणि हिरवे द्राक्षे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने यापैकी कोणते द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचे याबाबत आपल्या मनात नेहमीच शंका असते. अनेक आहार तज्ञ सांगतात की, द्राक्षे काळे असो किंवा हिरवे त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म नेहमीच आपल्या आरोग्याला चांगला फायदा देत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
grape

grape

आपण आपल्या आहारात नेहमीच फळांचा समावेश करत असतो. अशाच फळांपैकी एक आहे द्राक्ष, द्राक्षामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात. असे असले तरी, काळे द्राक्ष आणि हिरवे द्राक्षे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने यापैकी कोणते द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचे याबाबत आपल्या मनात नेहमीच शंका असते. अनेक आहार तज्ञ सांगतात की, द्राक्षे काळे असो किंवा हिरवे त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म नेहमीच आपल्या आरोग्याला चांगला फायदा देत असतात.

द्राक्षांचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते शिवाय यामुळे अनेक विकार देखील दूर करण्यास मदत होते. आज आपण काळे द्राक्ष आणि हिरवे द्राक्ष यापैकी कोणते द्राक्षे आपल्या शरीरासाठी अधिक फायद्याचे आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत.

काळी द्राक्ष खाण्याचे फायदे

  • काळ्या द्राक्षात असलेले औषधी गुणधर्म मानवी डोळ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करते. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे सांगितले जाते.
  • काळ्या द्राक्षात अनेक औषधी गुणधर्म असतात यापैकीच एक आहे पोटॅशियम, या पोटॅशियम मुळे मानवी हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त या द्राक्षांमध्ये साईटोकेमिकल्स आढळतात जे की आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • यामध्ये विटामिन ई देखील मोठ्या प्रमाणात आढळते, जे की मानवी त्वचा आणि केसांना विशेष फायदेशीर असते.
  • याच्या सेवनाने मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते, कारण की यामध्ये विटामिन के मोठ्या प्रमाणात असते.
  • असे सांगितले जाते की काळे द्राक्ष खालल्याने किडनीचे आरोग्य देखील चांगले राहते.

हिरवी द्राक्ष खाण्याचे फायदे

  • हिरव्या द्राक्षेमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगितले जाते.
  • हिरव्या द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स खूप अधिक असतात त्यामुळे उतारवयात मानवी मेंदूवर होणारा परिणाम कमी होत असल्याचे आहारतज्ञ सांगत असतात.
  • हिरव्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत होते याशिवाय रक्त वाढीसाठी देखील याचा उपयोग होत असतो.

हिरवे आणि काळे द्राक्ष दोघांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आढळतात. मात्र जरी असं असले तरी देखील हे दोन्ही द्राक्ष खाल्ल्याने मानवी शरीराला फायदा होत असतो. त्यामुळे आपणास जे द्राक्ष उपलब्ध होत असतील त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा:-

Health Tips| तुळशीचा चहा पिल्याने अनेक विकार होतात दुर; जाणुन घ्या मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या स्पेशल चहाविषयी

Side Effect Of Peanuts|.....असं असेल तर, चुकूनही खाऊ नका शेंगदाणा; नाहीतर आरोग्यावर होणार विपरीत परिणाम

English Summary: health tips black or green grape which best for human body learn more about it Published on: 12 March 2022, 01:36 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters