1. आरोग्य सल्ला

Health Tips| तुळशीचा चहा पिल्याने अनेक विकार होतात दुर; जाणुन घ्या मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या स्पेशल चहाविषयी

भारतात जवळपास सर्वच लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिऊन होत असते. आंघोळीनंतर चहा पिऊन अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात एवढेच नाही तर अनेक चहाप्रेमी दिवसातून अनेकदा चहाचे सेवन करणे पसंत करत असतात. मात्र असे असले तरी चहाचे अधिक सेवन मानवी आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते त्यामुळे जर आपणास चहा पिणे अधिक पसंत असेल तर आपण दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीचा चहा पिला तर आपल्या आरोग्यास यामुळे अधिक फायदा मिळू शकतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image courtesy- budwhitetea

image courtesy- budwhitetea

भारतात जवळपास सर्वच लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिऊन होत असते. आंघोळीनंतर चहा पिऊन अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात एवढेच नाही तर अनेक चहाप्रेमी दिवसातून अनेकदा चहाचे सेवन करणे पसंत करत असतात. मात्र असे असले तरी चहाचे अधिक सेवन मानवी आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते त्यामुळे जर आपणास चहा पिणे अधिक पसंत असेल तर आपण दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीचा चहा पिला तर आपल्या आरोग्यास यामुळे अधिक फायदा मिळू शकतो. 

असे सांगितले जाते की, तुळशीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात, यामुळे तुळशीचा चहा पिल्याने मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. एवढेच नाही तर तुळशीचा चहा पिल्याने मानवी शरीरातील अनेक विकार देखील दूर केले जाऊ शकतात. तुळशीमध्ये लोह, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात, जे आरोग्याच्या दृष्टीने खूपचं फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. म्हणून तुळशीचा चहा पिल्याने मानवी शरीराला अनेक फायदे मिळत असतात आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

कसा बनवणार तुळशीचा चहा- तुळशीचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या, नंतर त्यात 8-10 तुळशीची पाने टाका आपण चहाची चव वाढवण्यासाठी वेलची पूड आणि थोडे आलेही घालू शकता, कारण वेलची आणि आले घातल्याने चहाची चव वाढते.

यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्या उकळी आल्यावर 5 मिनिटांनी गॅस बंद करा आपला तुळशीचा चहा अशा पद्धतीने तयार होतो.

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे- रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते- अनेकदा लोक आजारी पडतात कारण की त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणुन रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुळशीचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो कारण की, यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट मानवी शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करत असतात.

मानवी शरीरातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते- ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते अशा रुग्णांसाठी तुळशीचा चहा खूप फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने रोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप तुळशीचा चहा घेतल्यास साखरेची पातळी अर्थात शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.

मानवी पाचन तंत्र सुधारण्यास मदत करते - तुळशीचा चहा पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. जर एखादा व्यक्ती रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा चहा सेवन करत असेल तर अशा व्यक्तीची पचनक्रिया मजबूत होते, याशिवाय पोटाशी संबंधित अनेक विकार दूर होण्यास देखील मदत होते.

English Summary: drink tulsi tea and get this benifit learn more about tulsi tea Published on: 11 March 2022, 10:54 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters