Health Tips| मित्रांनो आपण सुका मेवा म्हणून खजूर (Date Health Benifits) मोठ्या आवडीने खातो. चवीला उत्तम असल्याने याचे सेवन आपण अनेकदा करत असतो. चवीला ज्या पद्धतीने खजूर उत्कृष्ट असतो अगदी त्याच पद्धतीने खजूर आपल्या आरोग्यासाठी देखील उपयोगी (Date Benifits) असतो. खजूरमध्ये असलेले पौष्टिक गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी (Human Health) खूप फायदेशीर आहेत.
त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण अनेक आजार बरे होण्यासही मदत होते. मित्रांनो आपण रोज दुधासोबत खजूर खाऊ शकता. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होणार आहे. आज आपण खजूर झोपण्यापूर्वी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
रात्री झोपण्यापूर्वी खजूर खाल्ल्याने होणारे फायदे
खजूर हाडे मजबूत करतात
आहार तज्ञांच्या मते, खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. मध्ये असणारे हे पोषक गुणधर्म हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित अनेक समस्या दूर केल्या जातात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी खजूरचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
आहार तज्ञांनी रोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले असल्याचा दावा केला आहे. खजूरचे रोजाना सेवन केल्यास दृष्टी वाढण्यास मदत होत असते. मित्रांनो खजूरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळत असते. खजूर मध्ये आढळणारे हे विटामिन ए आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर असते. यामुळे खजुरचे सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचा दावा केला जातो.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त
कोरोनाच्या काळापासून लोक आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर जास्तीत जास्त लक्ष देताना बघायला मिळत आहेत, कारण ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांनाच या आजाराचा सामना करता येणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आहार तज्ञ लोकांना खजूर खाण्याचा सल्ला देतात. आहार तज्ञांच्या मते, खजूरमध्ये प्रोटीन, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
खजूर मध्ये आढळणाऱ्या या पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. एवढेच नाही तर खजूरमध्ये असलेले प्रोटीन स्नायूंना मजबूत करतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर आहे. यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी खजुरचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो
Share your comments