Health Tips : उत्तम शरीर (Healthy Body) किंवा उत्तम आरोग्य (Health) हीच खरी संपत्ती हे आपण अनेकदा ऐकलं असेल, किंवा आपण इतरांना अनेकदा असं सांगितलं असेल. पण आता आपलं शरीर (Human Health) उत्तम राखण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो आजच्या जीवनशैलीत आपण खात असलेल्या अन्नामुळे कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत आहे.
हो खरंचं, आपल्या आहारात समाविष्ट असलेल्या काही गोष्टी आपल्याला कर्करोगाकडे ढकलत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी एक बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण कोणत्या अशा 10 गोष्टी आहेत ज्याच्या सेवनाने कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
•आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. कॅन केलेल्या गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह मिसळले जातात. ते कर्करोगाचा धोका वाढवतात. पॅक केलेल्या लोणच्यामध्ये नायट्रेट्स, मीठ आणि कृत्रिम रंग असतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
•मायक्रोवेव्ह हे कर्करोगाचे कारण म्हणून ओळखले जातात. मायक्रोवेव्हमध्ये भाजलेले पॉपकॉर्न खाल्ले तर ते आणखी धोकादायक आहे. यामुळे परफ्युरोक्टॅनोइक अॅसिड तयार होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
•मद्यपान हे यकृत आणि मूत्रपिंड साठी हानिकारक आहे. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की जास्त मद्यपान केल्याने तोंड, अन्ननलिका, यकृत, कोलन आणि गुदाशय यांचाही कर्करोग होऊ शकतो.
•प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोकाही वाढतो. त्यात भरपूर मीठ आणि साखर असते, जे धोकादायक आहे.
•सेंद्रिय नसलेल्या फळांवर रसायनांचा लेप असतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तुम्ही त्यांचे जास्त काळ सेवन करू नये.
•सोडा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यात कृत्रिम साखर, रंग आणि रसायने आढळतात. या गोष्टींमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
•मैदा हृदय, मधुमेह आणि यकृतासाठी धोकादायक आहे. पीठ बनवण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही झपाट्याने वाढतो.
•बाजारात मिळणाऱ्या चिप्समध्ये भरपूर मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे शरीरात कॅन्सर निर्माण करणारी रसायने तयार होतात.
Share your comments