1. आरोग्य

जाणून घ्या कोणती आहेत शरीराला आरोग्यदायी पेये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
fruit drink

fruit drink

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे पाणी.विविध प्रकारचे फळांचे,भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम कारण त्यामध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. आज आपण या लेखात काही आरोग्यासाठी उपयुक्त काही पेया यांसंबंधी माहिती करून घेऊ.

  • मीठ पाणी:

मीट पाण्यामुळे तोंडातील लाळ निर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात.  त्यामुळे पोटातील पाचक एंजाइम जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्या मध्ये अन्नपचनासाठी आवश्यक एन्झाइम्स निर्माण होतात. मिठ पाण्यात अनेक खनिजे असतातच पण हे मीठपाणी नैसर्गिक जीवाणू विरोधी घटक म्हणून काम करते.

  • लिंबू पाणी:

 कुठलीही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिने उत्तम असते.लिंबू पाण्यामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात.त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लिंबू हा पोटॅशियम आणि कॅल्शिअम चा स्त्रोत आहे. ज्यामुळे स्नायू आणि हाडांना मजबुती मिळते. लिंबू तून शरीराला अँटी  इनफल्मेटरी घटक मिळतात.

  • नारळ पाणी:

 बारा महिने मिळणारे सर्वात सहज उपलब्ध असलेले नैसर्गिक पेय म्हणजे नारळ पाणी होय. सकाळी नारळ पाणी पिण्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत असते. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आढळून येतात. त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होतेआणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. नारळ पाणी हे आरोग्यासाठी चांगले आणि पौष्टिक असा स्त्रोत आहे. नारळ पाणी पिल्यामुळे आपली त्वचा ही टवटवीत राहण्यास मदत होते.

  • आवळ्याचा रस:

आवळ्या मध्ये असलेल्या विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आपले शरीर नैसर्गिकपणे डिटॉक्स म्हणजेच शरीरातील नको असलेल्या पदार्थांचानिचरा होण्यास मदत होते. त्यामुळे पचन संस्था चांगली राहण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • कोरफडीचा रस:

सकाळी जर आपण कोरफडीचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते. कोरफडीच्या गरांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. घोरपडी मध्ये असलेल्या अँटी इन्फलामेटरी तत्त्वामुळे शरीरातील वेदना, तान आणि थकवा दूर होण्यास मदत होते.  म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत कोरफडीचा रस सेवन करावे.

  • विविध भाज्यांचा रस:

आपल्याकडे विविध हंगामाप्रमाणे अनेक भाज्या मिळतात,ज्यामध्ये नैसर्गिक रित्या प्रथिन,जीवनसत्वेआणि खनिजे आढळून येतात.जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे.म्हणूनच भाज्यांचा रस यांचे सेवन करणे हा निरोगी आरोग्यासाठीउत्कृष्ट असा पर्याय आहे. यामध्ये विशेष करून हिरव्या पालेभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा. हिरव्या भाज्यांचा रस नियमितपणे पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाहीआणि शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक त्यातून मिळतात.

 

  • काकडी रस:

यामध्ये जवळपास 96 टक्के पाणी आणि फायबर असतात.काकडीला इलेक्ट्रोलाईट पावर हाउस देखील म्हणतात. हे शरीरातील हानीकारक रसायन आणि एसिड युक्त पदार्थांना बाहेर काढून पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात.

  • कोथिंबीर रस:

कोथिंबीर शरीर स्वच्छ करणाऱ्या एंजाईम ला वाढवते ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. यात अँटी सेप्टीक आणि अँटी फंगल गुणांचे प्रमाण जास्त आहे. याचा रस दररोज प्यायलास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • दालचिनी पेय:

दालचिनी मध्ये असणारे अँटी ऑक्सीडेंट आणि हळदी मध्ये असणारे क्युरा क्युमिनशरीराला डिटॉक्स करण्याशिवाय वजन कमी करण्यासाठी मदत करते. एक ग्लास पाण्यात दालचिनीचा तुकडा टाका. यात हळद मिसळा काही वेळा उकळा नंतर गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्यावे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters