1. आरोग्य सल्ला

पिस्ता खाण्यास आवडतो ना? आवडलाच पाहिजे कारण खूपच आहे गुणकारी

पिस्ता हे एक ड्रायफ्रुट आहे जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी तसेच आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमीनोऍसिड, जीवनसत्त्वे ए,के,सी,बी -6,डी आणि ई, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, फोलेट सारखी पोषक तत्त्वे असतात आणि इतर ड्रायफ्रूटपेक्षा कमी चरबी आणि कॅलरी असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pista health benifit

pista health benifit

पिस्ता हे एक ड्रायफ्रुट आहे जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी तसेच आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमीनोऍसिड, जीवनसत्त्वे ए,के,सी,बी -6,डी आणि ई, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, फोलेट सारखी पोषक तत्त्वे असतात आणि इतर ड्रायफ्रूटपेक्षा कमी चरबी आणि कॅलरी असते.

आपल्या आहारात त्याचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.पिस्ता नट म्हणून खाल्ले जाऊ शकतात किंवा खीर, रवा, जलेबी, उपमा इत्यादीमध्ये नट म्हणून वापरले जातात. जर तुम्हाला भूक लागली असेल, तर तुम्ही संध्याकाळी नाश्ता म्हणून मूठभर पिस्ता खाऊ शकता. जाणून घ्या पिस्ताचे 5 मोठे फायदे.

 

 

 

पिस्ता स्मरणशक्ती वाढवन्यास आहे खुपच रामबाण

आजकाल विसरण्याची समस्या खूप सामान्य होत आहे. सुरुवातीला, आपण ते सामान्य म्हणून पुढे ढकलतो, परंतु पुढे जाऊन ही समस्या गंभीर बनू शकते. अशावेळी पिस्ताचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अशी अनेक खनिजे पिस्तामध्ये आढळतात ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि ते अधिक सतर्क आणि सक्रिय बनते. पिस्ता खाल्ल्याने मेंदूला शक्ती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते.

 

 

 

पिस्ता खाल्ल्याने म्हणे हृदय तंदुरुस्त राहते.

पिस्ता खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रोज मूठभर पिस्ता खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल दूर होतो आणि हृदयाला सर्व जोखमींपासून संरक्षण मिळते. म्हणूनच त्याची गणना हृदयाला अनुकूल पदार्थांमध्ये केली जाते.

 

 

 

 

 

पिस्ता खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टळतो

अनेक संशोधन असे सुचवतात की पिस्ता खाल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. पिस्तामध्ये अँटी-कार्सिनोजेनिक घटक आढळतात, जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. अशा परिस्थितीत कर्करोगापासून बचाव करण्यासाठी पिस्ताचे सेवन खूप चांगले आहे.

 

 

 

 

पिस्ता हाडे बलवान करते

मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज असते. या दोन्ही गोष्टी पिस्तामध्ये आढळतात. अशा स्थितीत, त्याचे रोजचे सेवन हाडे मजबूत करते आणि हाडांशी संबंधित सर्व रोगांपासून आराम देते.

 

 

 

 

 

पिस्ता सुधारते डोळ्यांचे आरोग्य

डोळा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, ज्यामधून आपण जग पाहतो.  त्यामुळे त्यांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पिस्त्याचे दररोज सेवन केले पाहिजे कारण त्यात ए आणि ई जीवनसत्वे असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात.

 

 

 

 

 

मंडळी फायदे बघितलेत आता पिस्ता खाताना सावधानिता पण बाळगा

  • पिस्ता हा गरम पदार्थ असतो, त्यामुळे तो मुख्यतः हिवाळ्यात खाल्ला जातो. उन्हाळ्यात त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा अन्यथा अपचन,वगैरे समस्या उद्भवू शकतात.
  • जास्त पिस्ता खाल्ल्याने तुमच्या किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.
  • जास्त पिस्ता खाल्ल्याने तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते आणि अतिसार होऊ शकतो.
English Summary: health benifit of pistachio Published on: 30 August 2021, 07:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters