1. आरोग्य सल्ला

लहान आकाराची ओवा आहे औषधी गुणांनी समृद्ध, जाणून घेऊ तिचे आरोग्यदायी फायदे

ओवा आपल्या सगळ्यांना माहिती असलेला पदार्थ आहे. तो चवीला तिखट, किंचित तुरट आणि कडवट असतो. ओव्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांचा विचार केला तर त्यामध्ये लोह, कॅल्शियम,पोटॅशियम, आयोडीन आणि केरोटीन मोठ्या प्रमाणात असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
carom seeds

carom seeds

ओवा आपल्या सगळ्यांना माहिती असलेला पदार्थ आहे. तो चवीला तिखट, किंचित तुरट आणि कडवट असतो. ओव्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांचा विचार केला तर त्यामध्ये लोह, कॅल्शियम,पोटॅशियम, आयोडीन आणि केरोटीन मोठ्या प्रमाणात असतात.

त्याचप्रमाणे ओव्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटिन्स देखील असतात. भारतामध्ये बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये ओव्यांचा वापर आवर्जून केला जातो.

जर ओव्या च्या लागवडीचा विचार केला तर हे पीक राजस्थान,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या ठिकाणी घेतले जाते.ओवायाआरोग्यदायी असल्यामुळे घरच्या घरी अनेक आरोग्यविषयक समस्या कमी करता येतात. या लेखात आपण ओव्यांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

 

ओव्यांचे आरोग्याला होणारे फायदे?

  • ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांना वेदना होत असतात. अशावेळी ओव्याची पुरचुंडी तयार करून वेदना होत असलेल्या भागावर शेक द्यावा. किंवा अर्धा कप पाण्यात ओवा उकळून त्यात सुंठ मिसळून त्याचे सेवन केले तर संधिवातात खूप आराम मिळतो.
  • ओव्या मुळे भूक नियंत्रित होते आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठीदेखील मदत होत. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्रभर भिजवून सकाळी हे पाणी उकळून त्यात मध घालून चहाप्रमाणे प्यावे.
  • अकाली केस पांढरे होणे ही एक फार मोठी समस्या आहे. या समस्या साठी जर एक ग्लास पाण्यात एक चमचा कडीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा या काढायचे नियमितपणे सेवन केले तर केस अकाली पांढरे होणार नाहीत.

 

  • चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी देखील ओवा प्रभावी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि मुरुमांच्या जागी दहा ते पंधरा मिनिटे लावा. यामुळे त्वचेच्या आत अडकलेल्या धुळीपासून मुक्त होण्यास आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होईल.
  • पोटदुखी,गॅस, अपचन झाले असल्यास ओव्या सोबत काळे मीठ आणि चिमूटभर हिंग घालून खाल्ले जाते. ओव्यांमध्ये थायमोल नावाचे कंपाऊंड, ऑंटीस्पास्मोडिक आणि केमेनॅटिव्हगुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील वायू चा प्रभाव कमी होतो.

( टीप – कुठलाही औषधोपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

English Summary: health benifit of carom seed Published on: 13 September 2021, 11:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters