1. आरोग्य सल्ला

Healthy Oil: आरोग्यासाठी उपयुक्त आहेत ही तेलं, जाणून घेऊ या तेलांच्या आरोग्यदायी फायद्याबद्दल

आपल्या आहारामध्ये आपण तेलाचा उपयोग करत असतो.प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वयंपाकतकरत असतात. परंतु त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची पुरेशी माहिती आपल्याला नसते. आरोग्यासाठी कोणते तेल फायद्याचे आहे किंवा कोणत्या तेलाचा आपल्या आहारात समावेश केल्यास आपल्या आरोग्याला फायदा होतो, त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
edible oil

edible oil

आपल्या आहारामध्ये आपण तेलाचा उपयोग करत असतो.प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वयंपाकतकरत असतात. परंतु त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची पुरेशी माहिती आपल्याला नसते. आरोग्यासाठी कोणते तेल फायद्याचे आहे किंवा कोणत्या तेलाचा आपल्या आहारात समावेश केल्यास आपल्या आरोग्याला फायदा होतो, त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.

तेलाचे वेगवेगळे प्रकार व त्यांचे आरोग्यदायी फायदे

  • शेंगदाणा तेल- शेंगदाणा तेलामध्ये सगळ्याच प्रकारचे फॅट असतात.हे फॅड हृदयविकारापासून बचाव करतात. शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्री रॅडिकल्स रोखतात आणि आपला कर्करोगापासून बचाव होतो. शेंगदाणा तेल आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
  • तिळाचे तेल-तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉनरिफाइंड.रिफाइंड न केलेले तिळाचे तेलअन्नाला सुगंध देते.तिळाच्या तेलात विरघळणारे अँटिऑक्सिडंट असतात. फ्री रॅडिकल ची निर्मिती रोखतात. तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म असतो.तिळाचे तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे.  तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे.जे लोक  नेहमी वापरतात ते ताण तणावावर सुद्धा मात करू शकता.तिळाच्या तेलात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.
  • सूर्यफूल तेल-या तेलामध्ये ई जीवनसत्व जास्त प्रमाणात असते.तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. सनफ्लावर तेलामध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात.त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात.म्हणून सनफ्लावर तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.
  • करडई तेल- करडई तेलामुळे वजन कमी करण्यास मदत होते. करडई तेल पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते.त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांना आत जाण्यास मज्जाव होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. करडई तेल हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, त्यामुळे हे तेल मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. महत्त्वाचे म्हणजे शक्य असेल तर सेंद्रिय रिफाईन न केलेले वनस्पती तेल वापरावे. कच्चे तेल वापरायचे असेल तर शुद्ध ऑलिव्ह तेल वापरा.पण त्याचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नका.

तेलाबद्दल उपयुक्त माहिती

  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, थंडप्रक्रिया केलेले आणि सेंद्रिय तेल रेफाईन्डतेलापेक्षा चांगले असतात.तेलाना रिफाईन केल्यामुळे त्यांचे आरोग्यदायी गुण कमी होतात.
  • तेलांचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे पण आहे. म्हणून असे तेल वापरा की ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ट्रान्सलेट असलेले तेल टाळा. वनस्पती तेलात ट्रान्स फॅट जास्त असतात,त्यामुळे ते शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. हृदयविकार होण्याची संभावना असते. यामुळे तेल असे वापरा की त्याचा स्मोक पॉईंट जास्त आहे.त्यात अँटिऑक्सिडंट व विटामिन जास्त प्रमाणात असतील तर फारच चांगले.
English Summary: groundnut oil,sunflower oil is benificial for health and many disease Published on: 05 December 2021, 02:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters