प्रत्येकाला माहित आहे की दररोज एक ग्लास दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. यातून आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेली प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, खनिजे आणि चरबी मुबलक प्रमाणात मिळतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, शेळीच्या दुधात आपण रोज पिणाऱ्या गाईच्या दुधापेक्षा आणि म्हशीच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असतात.
आतापर्यंत आपण गाईच्या आणि म्हशीच्या दुधाच्या पॊष्टिकतेबद्दल बरंच ऐकलं असणार. मात्र शेळीच्या दूधामुळेही बरेच फायदे होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. शेळीच्या दुधामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच, शिवाय आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावते.आता जाणून घेऊया या पौष्टिकतेबद्दल तसेच शेळीच्या दुधाचे मूल्य आणि यातून होणारे आरोग्याला फायदे.
शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांची ताकद वाढते. शेळीचे दूध रोज प्यायल्यास वयानंतर येणारे सांधेदुखी तसेच संधिवाताचा त्रास कमी होतो. बकरीच्या दुधातील चरबीचे रेणू पचण्यास सोपे करतात. त्यामुळे पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी रोज शेळीचे दूध पिणे चांगले.
'ड्रॅगन फ्रूट' लागवडीवर राष्ट्रीय परिषद आयोजित; क्षेत्रफळ वाढवण्यासाठी ५ वर्षांचे धोरण विकसित
शेळीच्या दुधात सेलेनियम भरपूर प्रमाणात असते जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अशा प्रकारे अनेक प्रकारचे कार्सिनोजेन नष्ट केले जाऊ शकतात. एवढंच नाही तर शेळीच्या दुधात व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेच्या समस्या दूर करते आणि त्वचेवर नवीन पेशींना प्रोत्साहन देते.
चेहरा धुण्यासाठी शेळीचे दूध नारळाच्या दुधात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. दुधातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मदत करतात. दररोज शेळीचे दूध पिल्याने लाल रक्तपेशींचा विकास होतो तसेच अशक्तपणा टाळता येतो.
महत्वाच्या बातम्या:
पावसाअभावी 'सर्वाधिक अन्न उत्पादक' राज्यांना मोठा फटका; शेतकरी चिंतेत
नैसर्गिक शेतीला मिळणार चालना; पंतप्रधान नरेंद्र मोदी 'नैसर्गिक शेती परिषदे'ला करणार संबोधित
Share your comments