1. आरोग्य सल्ला

Ghee Side Effects: सावधान! 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये तूपाचे सेवन, अन्यथा….

Ghee Side Effects: तूप (Ghee) ही भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहे, ज्याचा अनेक लोक त्यांच्या रोजच्या आहारात समावेश करतात. तूप वापरण्यासही खूप सोपे आहे. तूप रोटीमध्ये लावले जाते, भाज्या आणि मसूरमध्ये टाकले जाते आणि आयुर्वेदात थेट सेवन केले जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ghee side benifits

ghee side benifits

Ghee Side Effects: तूप (Ghee) ही भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहे, ज्याचा अनेक लोक त्यांच्या रोजच्या आहारात समावेश करतात. तूप वापरण्यासही खूप सोपे आहे. तूप रोटीमध्ये लावले जाते, भाज्या आणि मसूरमध्ये टाकले जाते आणि आयुर्वेदात (Ayurveda) थेट सेवन केले जाते.

तूप हेल्दी फैट्सचा चांगला स्रोत आहे आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्याला (Health) अनेक प्रकारे फायदा देखील होऊ शकतो. रिकाम्या पोटी तूप खाण्याचेही देखील अनेक फायदे (Ghee Health Benifits) आहेत, कारण यामुळे पचनक्रिया साफ होते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

तुपामध्ये एंटी-एजिंग आणि हृदय-हेल्दी गुणधर्म असतात, ज्यामुळे तूप डोळ्यांच्या आरोग्यासाठी (Health Tips) चांगले असते. याशिवाय तूप मेंदू, स्मरणशक्ती, पचन, त्वचा इत्यादींसाठी फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, तूप प्रत्येकासाठी फायदेशीर नसू शकते आणि अनेकांना नुकसान देखील करू शकते.

निरोगी मानली जाणारी प्रत्येक गोष्ट आपल्यास अनुरूप असेलच असे नाही. ते तुमच्या शरीराला शोभतं की नाही याकडेही लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला तर मग मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लोकांनी तुपाचे सेवन अजिबात करू नये.

1.आपल्या पचनसंस्थेसाठी तूप पचायला कठीण आहे. जर तुम्हाला अनेकदा पचन आणि पोटाच्या समस्यांचा त्रास होत असेल तर तुपाचे सेवन करू नका.

2.लीवर सिरोसिस, स्प्लेनोमेगाली, हेपेटोमेगाली, हेपेटाइटिस  इत्यादी लिवर आणि प्लीहाच्या आजारांमध्ये तूप खाणे टाळावे.

3.गरोदरपणात तूप सेवन करताना दुप्पट काळजी घ्यायला हवी. गरोदरपणात तुमचे वजन खूप वाढले असेल तर तूप अजिबात खाऊ नका.

4.तापामध्ये तूप खाऊ नये, विशेषत: हवामानातील बदलामुळे होणाऱ्या तापामध्ये तूप खाऊ नये.

English Summary: ghee side effects these people should avoid ghee eating Published on: 18 July 2022, 10:18 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters