सध्याच्या काळात अगदी जिना जरी चढला तरी धाप लागते तसेच घाम येतो. जे की तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर धावणे किंवा चालणे हा व्यायामाचा भाग आहे मात्र बहुतेक लोक व्यायामापेक्षा धावण्याला खूप महत्व देतात. कारण यासाठी कोणत्याही साहित्याची गरज नसते. मात्र तुम्हाला त्यासाठी स्टॅमिना असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवून अस्वस्थ तसेच ताण तणावाचा सामना करू शकता. जे की स्टॅमिना वाढल्याने थकवा देखील कमी येतो तसेच तुम्ही आनंदी राहू शकत. मात्र आज आपण हे पाहणार आहोत की स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात.
१. बिटरुट :-
बीटरूट फळ खेळाडू लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण बीटरुट मध्ये नायट्रेट्स असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तप्रवाह सुद्धा नियंत्रणात ठेवतात. तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल तर याचे सेवन तुम्ही चालू ठेवा. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत. जीवनसत्त्वे बी, सी आणि बीटा कॅरोटीन आहे. एवढेच नाही तर आपले शरीर अधिक नायट्रिक ऑक्साईड तयार करते ज्यामुळे आपला स्टॅमिना खूप वाढतो.
हेही वाचा:-शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर
२. ओट्स :-
जर तुम्ही रोज सकाळी रनिंग ला जात असाल तर ओट्सचे सेवन करा कारण त्यात खूप प्रमाणत कार्ब असतात. सर्व कार्बोहायड्रेट वजन कमी करण्यासाठी मानले जातात मात्र सर्वच वाईट नसतात, फक्त तुम्हाला योग्य कर्बोदके निवडण्याची गरज आहे. ओट्समध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी प्रमाणत असतो जो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ते सर्वोत्तम अन्न मानले जाते. तसेच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत होते. जे की तुम्हाला जास्त वेळ ऊर्जा टिकवते.
३. केळी :-
तुम्ही जर व्यायाम करण्याआधी केळीचे सेवन केले तर तूम्हाला चांगली ऊर्जा मिळते. जे की केळीमध्ये खूप प्रमाणात फायबर असते तसेच ते कार्बोहायड्रेट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. केळी खाल्ल्याने आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 6 व अँटिऑक्सिडंटची पातळी वाढणे जे आपल्या स्टॅमिना साठी फायदेशीर मानले जातात.
हेही वाचा:-लिचीची शेती करून कमवू शकता बक्कळ पैसा, जाणून घ्या लीची शेतीचे व्यवस्थापन आणि लागवड.
४. ब्राउन राईस :-
ब्राउन राईसमध्ये फायबर चे प्रमाणत जास्त असते तर स्टार्च चे प्रमाण कमी असते. जे की हा राईस पचायला सुद्धा खूप वेळ लागतो. जे की हा राईस खाल्याने तुमचे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटेल आणि तुमचा स्टॅमिना देखील जास्त वेळ टिकून राहील.
५. पालक :-
पालक भाजीमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के असतात जे आपल्या स्टॅमिना साठी खूप फायद्याचे असतात. कारण जर तुमच्यामध्ये स्टॅमिना नसेल तर तुम्हाला थकवा येणे भाग आहे आणि तोच थकवा दूर करण्याचा असेल तर तुम्हाला पालक भाजी खाणे खूप गरजेचे आहे. जे की तुम्ही या भाजीमुळे फिट राहू शकत.
Share your comments