1. आरोग्य सल्ला

कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे

सध्या कोरोनाच्या ( Corona) गंभीर परिस्थिती सुद्धा, सोशल मीडिया वरून, खोटे व्हायरल (Viral) मेसेज प्रसिद्ध होत आहेत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे

कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे

सध्या कोरोनाच्या ( Corona) गंभीर परिस्थिती सुद्धा, सोशल मीडिया वरून, खोटे व्हायरल (Viral) मेसेज प्रसिद्ध होत आहेत, त्या मेसेजची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड (Forward) करून देत आहेत. कोरोना जितका भयंकर आहे तितकाच प्रकारे सोशल मीडियावर फसवणाऱ्या अफवा देखील फार भयानक आहेत, नागरिकांनी अश्या अफवा पासून सावध राहायला हवे.

सध्या व्हाट्सअप (WhatsApp) वर एक मेसेज व्हायराल होत आहेत,आता कोबीमधून कोरोना होत असल्याचा दावा केला गेला आहे तसेच कोबी न खाण्याचा सल्ला देखील दिला जात आहे (viral message that corona spreads through cabbage) यामागचं नेमकं सत्य काय आहे? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

या मॅसेज अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने हा खोटा मॅसेज व्हायरल (Message viral) होत आहे. पी आय बी संघटनेने हा मेसेज खोटा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ( the United Nations) अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. त्यामुळे अश्या मेसेज शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवा व तो पुढे फॉरवर्ड (Forward) करा.

कोबी (Cabbage) खाल्ल्याने कोरोना होतो, असे कोणतीही वैज्ञानिक पुरावे सापडले नाहीत तसेच अन्नामधून कोरोना पसरत असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर (On the website) सांगितले आहे हा मेसेज खोटा असून अशा खोट्या मेसेजला बळी पडू नका

याउलट कोबी खाण्याचे अनेक फायदे होतात

तुम्हाला तुमची भूक क्षमवायची असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही कोबी खाच. १०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धन आहे.

कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.

कप होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.

हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.

१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धन आहे.

कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.

English Summary: Fact Check: Cabbage makes corona? Find out the truth Published on: 13 March 2022, 06:45 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters