घरामध्ये नेहमीच काही साधारण अपघात होतात. त्यातील महिलांना नेहमीच. स्वयंपाक करताना. पोळी शेकतांना, वाफ हातावर येणे, भाजी फोडणी देताना तेल अंगावर उडते. मग अशा वेळी अगदी लगेच दवाखान्यात जायला सुचत नाही.
तेव्हा आपण बघू या काही घरगुती उपाय.-1) कोरफडीचा गर लगेच लावा. अगदी थंडावा मिळतो व जखम भरून यायला मदत होते.2) हळदीचे पाणी लावावे.शुद्ध खोबरेल तेलात हिरड्या चे चूर्ण मिसळून तिथे लावा. जखम भरून यायला मदत होते.3) कच्च्या बटाट्याचा रस तिथे लावा. फफोला येत नाही
4) शुद्ध खोबरेल तेलात तुळशीच्या पानांचा रस मिसळून फेटून घ्या व तिथे लावा आग थांबते व फोड येत नाही.5) गायीचे शेण तिथे लावा लगेच बरे वाटेल.6) डाळिंब व चिंच एकत्र वाटून हा लेप तिथे लावावा. फोड येत नाही. किंवा डाळिंब झाडाची पाने वाटून तिथे लावा लगेच बरे वाटते.7) बाभळीचा डिंक पाण्यात घोळुन हे पाणी भाजलेल्या जागेवर लावल्यास फोड येत नाही.
8) पिकलेले केळे कुस्करून भाजलेल्या जागेवर लावल्यास आग होत नाही व फोडही येत नाही 9) मुलतानी माती ओली करून तिथे लावल्यास आग होत नाही व फोड येत नाही 10) पांढऱ्या कोहळ्याच्या पानांचा रस तिथे लावा. लगेच बरे वाटते.11) मेंदीची पाने वाटून हा लगदा तिथे लावावा. थंडावा मिळतो व फोड येत नाही.
12) बोराची मऊसर पाने वाटून हा लगदा तिथे लावा. फोड येत नाही 13) तीळ वाटुन हा लगदा तिथे लावा. फोड येत नाही 14) कडूनिंब तेल तिथे लावा. लगेच थंडावा मिळतो व फोडही येत नाही 15) कणीक भिजवून मग हा लगदा तिथे लावा. थंड वाटतं आणि फोडही येत नाही 16) कोरफडीचा गर व मध एकत्र करून तीथे लावावा. यानेही फोड येत नाही अशा प्रकारे तुम्ही भाजलेली जागा सुरक्षित करू शकता.
English Summary: Effective home remedies for burns and burnsPublished on: 20 May 2022, 04:54 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments