1. आरोग्य सल्ला

लाकडी घाणा तेल खाऊयात निरोगी राहुयात

जागतिक स्तरावरील एका सर्वेनुसार भारतामध्ये आजच्या काळात हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
लाकडी घाणा तेल खाऊयात निरोगी राहुयात

लाकडी घाणा तेल खाऊयात निरोगी राहुयात

जागतिक स्तरावरील एका सर्वेनुसार भारतामध्ये आजच्या काळात हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुण वयातील मुलामुलींना सुद्धा आजकाल हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. त यामध्ये हृदयविकारचे अनेक कारणं असले तरी, मात्र जे मुख्य आणि प्रबळ असं कारण पुढे येते ते म्हणजे,आपण रोज वापरत असलेले पॅकबंद किंवा डबाबंद खाद्यतेल होय.

असे सांगितले जाते की, हे अगदी नामांकित कंपन्यांचा खाद्यतेलाचा वापर आपल्या आहारामध्ये असल्यास,तरीसुद्धा आपल्याला हृदयविकार या गं-भीर आ-जाराचं धो का निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या काळात, भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी तेलाची आयात केली जाते. याशिवाय यामध्ये प्रामुख्याने मलेशिया या देशातील पामोलिन या खाद्यतेलाची सर्वात जास्त प्रमाणात आयात केली.  हे भारतात पामतेल नावाने ओळखले जाणारे या खाद्यतेलाची किंमत भारतामध्ये फक्त 20 ते 22 रुपये प्रति लिटर असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, या पामतेलाचा उपयोग करण्यासाठी भारतामध्ये काही तेल कंपन्या हे पाम तेल लाखो-करोडो लिटर,

दर महिन्याला आयात करत असतात आणि आपल्या कंपनीच्या खाद्यतेलात हे पामतेल मोठ्या प्रमाणात मिक्स करतात.

यामध्ये सूर्यफुलाच्या , रेणुकाच्या, कोकोनट ऑइल मध्ये अगदी मोहरीच्या आणि तिळाच्या खाद्यतेलाचे उत्पादन करण्यास मोठया कंपन्या याचा वापर करत आहेत. तसेच हे पामतेल इतर तेलामध्ये न समजण्यासारखे मिसळून, डबल रिफाइन करून हे विकलं जात आहे. या पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, या जगातील कोणताही देश या पामतेलाचा खाण्यासाठी उपयोग करत नाही.

कारण पामतेलाचे उपयोग प्रामुख्याने हा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये केला जातो.असे सांगितले जाते की, हे तेल मलेशिया मध्येही खाण्यास बंदी आहे किंवा वापरले जात नाही. या तेलाच्या पूर्वी भारतामध्ये मोहरीचे किंवा तिळाच्या तेलाचे किंवा खोबरेल तेलाचे उत्पादन चांगलं होत असल्याने याचा वापर आपल्या खाद्य पदार्थमध्ये होत असतो, तसेच हे तेल 100% नैसर्गिक असल्याने लोकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

पण सध्या पामतेल स्वस्त असल्याने भारतीय कंपन्यांना आकर्षित करते आणि म्हणून हे स्वस्तातलं पाम तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. परिणामी मोहरी आणि तीळ उत्पादन करणाऱ्या शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे.याशिवाय सर्वात जास्त तोटा हा हे पामतेल खाणाऱ्यांना होत आहे.

काही वर्षपूर्वी हे पामतेल कोणत्याही इतर तेलामध्ये मिक्स करण्यास का-यद्याने बंदी होती. मात्र जागतिक स्तरावरून काही करारानुसार भारतावर दबाव वाढवला गेला आणि मग भारताने आधुनिक कायद्यानुसार हे पामतेल इतर तेलामध्ये मिक्स करण्यास परवानगी दिली.

या तेलामध्ये ट्रान्सफॅट्स नावाचा एक घटक असतो.या घटकामध्ये एक प्रकारची अशी चरबी असते की, जी कोणत्याही तापमानाला विरघळत नाही ,तुम्ही कितीही व्यायाम केलात तरी ही चरबी कमी होत नाही. ट्रान्सफॅट्स अशाप्रकारे आपल्या शरीरामध्ये साठत राहतात.

हळूहळू आपल्या शरीरातील धमण्यामध्ये किंवा रक्त वाहिन्यांमध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ही चरबी मोठ्या प्रमाणावर साठते आणि अशावेळी मग हार्ट अटॅक येतो तसेच आपल्याला अर्धांगवायूचा, पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते. मग यावर उपाय म्हणून,शेंगदाणे तेल, करडईतेल मोहरीच्या किंवा खोबरेल तेल किंवा सूर्यफुलांच्या तेलाचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे.

कारण हे तेल अतिशय घट्ट आणि या तेलाचा साधारपणे वास येत असल्याने, हे तेल आपण खरेदी करत नाही. पण हा जो या खाद्यतेलाचा घट्टपणा आणि चिकटपणा आहे हे तेलाचे काही गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरावर घातक परिणाम करत नाहीत. म्हणून रोजच्या जेवणात तरल वापरताना ते पूर्ण विचार करून वापरावे जेणेकरून आपल्याला त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत व आपणच आपलं निरोगी जीवन बरबाद करू शकणार नाही.

English Summary: Eat wood oil to stay healthy Published on: 28 April 2022, 07:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters