1. आरोग्य

चिकू खाऊन इम्यूनिटीसह चेहऱ्यावर आणा तजेलदारपणा

KJ Staff
KJ Staff


चिकू हे फळ हिवाळा उन्हाळा या सगळ्या ऋतूंमध्ये फार आवडीने खाल्ले जाते.  अनेकजण चिकूचा ज्यूसही घेतात.  चिकू हे फळ आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.  अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकत्या पडत असतात, चिकू खाल्याने सुरकत्या कमी होतात. सध्या ज्या विषाणूला आपण सर्वजण तोंड देत आहोत त्या कोरोनाला पराजित करण्यासाठी आपल्याकडे रोगप्रतिकारक शक्ती असणे फार महत्त्वाचे असते. इतकेच काय स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढा देताना आपण आपली इम्यूनिटी वाढवावी असा सल्ला दिला होता. यामुळे आपली इम्युनिटी वाढविण्यासाठी चिकू खूप फायदेशीर आहे. चिकूच्या सेवनाने इम्युनिटी सिस्टम चांगली होते.

 चिकूमुळे होणारे आरोग्यदायी फायदे

1= पचन क्रिया होते चांगली

      फायबर असलेल्या फळांमुळे पचन क्रिया चांगली होते व त्यामुळे आतड्या चांगल्या राहतात. चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात चिकू मध्ये टॅनिन चे  प्रमाण अधिक असतं, हे शरीरात अँटी इन्फ्लमेटोरी एजन्ट सारखं काम करतात. त्यामुळे पोटाचे संबंधित व आतड्याची निगडित समस्या पासून बचाव केला जातो.

2= सर्दीपासून बचाव

हिवाळी ऋतूत आणि थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना सर्दीचा त्रास होतो जर आपण अशा वेळी जर चिकू खाल्ला तर छातीत अडकलेला कप नाकावाटे बाहेर पडतो त्यामुळे लगेच आपल्याला आराम मिळू शकतो.

3= एंटीऑक्सीडेंट

    चिकू मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सि आणि व्हिटॅमिन ई अधिक प्रमाणात असते जर आपण नेहमी चिकू खाल्ले तर आपली त्वचा हेल्दी होईल आणि त्याचे मध्ये चांगल्या प्रकारचा तजेलदारपणा दिसून येईल. चिकू मध्ये एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्या पासूनही बचाव करता येतो त्यासोबतच हे फळ खाल्ल्याने केस मुलायम होतात आणि केस गळती कमी होते. त्यामुळे हे फळ जास्तीत जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर आहे

   कॅल्शियम फॉस्फरस आणि आयर्न सारखे मिनरल्स हे  घटक हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी असतात. चिकू मध्ये हे सर्व घटक आढळतात त्यामुळे चिकू खाल्ल्याने हाडे बळकट होण्यास मदत होते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters