मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. तसंच, ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकतं. सफरचंद खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे सफरचंदाचे नियमित सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो. सफरचंदाच्या नियमित सेवनानं टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
सफरचंदाच्या सेवनानं वृद्धत्वामुळं मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत –
सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. मूतखड्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचं सेवन करू शकता. सफरचंदाच्या सेवनानं वृद्धत्वामुळं मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.सफरचंदातील फायबर तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करतं.
सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.
सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्यानं चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात. हे तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? सफरचंद खाण्याची उत्तम वेळ आपण सफरचंद कधीही खाऊ शकतो.
मात्र, सकाळी सफरचंदाचं खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो.याचं कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं रात्रीच्या वेळी याचं सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळं सकाळची वेळ याचं सेवन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असू शकते.
Share your comments