गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लंपी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे आता याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे. यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. लंपी रोगाचा फैलाव देशातल्या महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर 11 राज्यांमध्ये झाला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
असे असताना आता या रोगाला घेऊन काही (Rumour) अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. यामुळे दूध प्यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे येथे शहरी भागातील (Milk supply) दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे.
दरम्यान, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे. हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे.
देशाचे आयटी हब संकटात! पावसाचा हाहाकार, घरात बाहेर सगळीकडे पाणी, हॉटेलमध्ये ४० हजार भाडे..
पशूसंवर्धन विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत लाखोंहून अधिक जनावरांना या विषाणूची लागण झाली आहे. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या देशात त्वचारोगाची पहिली प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच त्वचेचा रोग देशाच्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे.
१०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, करोडो रुपये जप्त, सोलापूरमध्ये खळबळ...
यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत. आता जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाईल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
Lumpy Diseases: लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा..
काय सांगता! जास्त काम केले तर कॉम्प्युटरचा माऊस पळून जाणार, तो पकडताही येणार नाही..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! लंपी रोगाचा हाहाकार, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून १ लाख मोफत लसी उपलब्ध
Share your comments