
दुधाचा घट्ट चहा पिताय? मग आधी आरोग्यावर होणारे हे दुष्परिणाम वाचा
कमीत कमी दूध नि जास्त पाणी असणाराच चहा घ्यायला हवा. फक्त दुधाचा चहामुळे पित्त वाढते नि त्यातून डोकेदुखी, अपचन, मळमळणे, पोटफुगीसारखे विकार होऊ शकतात.सर्वात बेस्ट ब्लॅक टी (कोरा चहा), लेमन टी, आलं घातलेला चहा आणि एक नंबर गुळाचा चहा. आपणास 90% आजार पोटातून होतात. साखरेचा चहा टाळल्यास 45% आजार आपोआप नष्ट होतील. चहामुळे आरोग्यावर होणारे इतर तोटे जाणून घेऊ या..
चहाचे दुष्परिणाम.रोज 5-10 कप अति उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी, मलावरोध असे विकार जडतात.भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठे काम करणाऱ्यांना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, स्थूलता असे विकार जडू लागतात.
अति प्रमाणात दूध-साखरविरहित चहा घेतल्यास रक्तदाब वाढणे, पक्षाघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होते. दूध, साखर नि चहाची भुकटी मिसळून उकळलेला चहा कफ, पित्त आणि वात वाढविणारा, उष्ण गुणांचा आहे.टपरीवर ॲल्युमिनियमच्या भांड्यात चहा उकळतात. ॲल्युमिनियमचा दीर्घ काळ संपर्क राहिल्याने
Share your comments