वजन जास्त असणे ही एक गंभीर बाब आहे, पण आपलं वजन खरच वाढलं आहे, की तुमच्या सहवासातील लोक बारीक आहेत, इतरांच्या वजनाची आपल्या वाजनाशी तुलना होऊ शकत नाही म्हणुन लक्षात ठेवा वजन काटा भरवशाचा का नसतो ?
काही गोष्टी ज्या विचारात घेणे गरजेचे आहेत.
- आपल्या शरीराचं वजन दोन प्रकारचं असतं- चरबीचं वजन आणि स्नायू - हाडांचं वजन.
- वजन काट्याकडे बघून स्वत : च्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत नाही.
- आपल्या शरीरातल्या चरबीचं वजन किती आहे (शरीरात चरबीचं प्रमाण किती आहे) हे एकूण वजन किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. उदा. सेरेना विल्यम्सचं(टेनिसपटू आहे, आणि वजन जवळपास 72 किलो) एकूण वजन खूप जास्त आहे, पण त्यात तिच्या स्नायू-हाडांचं वजन जास्त आहे, चरबीचं वजन तुलनेनं खूप कमी आहे.
- तसेच फॅशन टीव्हीतल्या मॉडेल्सचं एकूण वजन खूप कमी असतं, त्या अगदी हडकुळ्या दिसतात,
पण त्यांच्यातल्या काहींमध्ये चरबीचं प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत जास्त असतं.
- चरबीचं प्रमाण पुरुषांमध्ये 14- 18 % पर्यंत आणि बायकांमध्ये 16-22 % पर्यंत असणं आदर्श मानलं जातं.
- त्यामुळे BMI (बॉडी - मासइंडेक्स) नुसारसुद्धा प्रकृतीचा अंदाज बांधू नये.
बॉडी मास इंडेक्स = वजन(किलो) : उंची(मीटर २)
कारण BMI मध्येही शरीराच्या एकूण वजनाचाच विचार होतो.
एकूण वजनात चरबीच्या वजनाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जात नाही. (समान BMI असलेल्या दोन व्यक्ती पूर्णपणे भिन्न दिसू शकतात कारण त्यांच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण वेगळं असू शकतं.
- उदा. जिच्या शरीरात जास्त चरबी आहे ती व्यक्ती खूप लठ्ठ पण अशक्त असू शकते आणि जिच्या शरीरात कमी चरबी आहे ती व्यक्ती सडपातळ आणि तंदुरुस्त दिसू शकते.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Share your comments