सध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर (health) परिणाम होत असताना पाहायला मिळत असतात. अनेकांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरातील वाढती चरबी किंवा वाढते वजन कित्येक आजारांचे कारण असते.
त्यामुळे आज आपण फिटनेसबाबद (Fitness) माहिती घेणार आहोत. चालण्याने वजन कमी होते, असे बोलले जाते. पण हे खरे आहे का? याविषयी आज आपण माहीती जाणून घेणार आहोत.
दररोज चालण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. विशेषत: पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यात खूप मदत होते. सकाळी आणि अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो.
'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी चालणे गरजेचे
जर तुम्ही दररोज चालत असाल तर वजन कमी (Weight Loss) करणे सोपे होते आणि पोटावरील चरबी कमी होण्यास देखील मदत होते. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर हळू चालण्याऐवजी वेगाने चालण्याची सवय लावा.
महत्वाचे म्हणजे जे लोक 8 ते 10 तास ऑफिसमध्ये (office) बसून काम करतात, त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. शारीरिक हालचाली कमी केल्याने उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे शरीराची हालचाल वाढवण्यावर भर द्या.
गव्हाच्या 'या' ३ जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल; फक्त १२० दिवसात देतील तब्बल ९० क्विंटल उत्पादन
एका दिवसात किती चालले पाहिजे?
चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जर तुम्हाला लठ्ठपणा वाढू (Increase obesity) नये आणि तुम्हाला हृदयाशी निगडीत आजारांचा धोका नको असे वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही किमान 10 हजार पावले चालली पाहिजेत, जर तुम्ही दररोज एवढी मेहनत केली तर तुमच्या आरोग्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे होतील.
चालण्याचे इतर फायदे
चालण्यामुळे (walking) तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगली राहते, यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते ज्यामुळे जडपणाची समस्या येत नाही, याशिवाय यामुळे आपले मानसिक आरोग्यही सुधारते, त्यामुळे रोज चालण्याची सवय लावणे फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या
आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळणार; एलआयसीची 'ही' योजना शेतकऱ्यांना देतेय मोठी संधी
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये
सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
Share your comments