मूत्रामध्ये जो खडा बनतो त्यास मूतखडा असे म्हणतात. लघवीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले म्हणजे क्षार एकमेकास चिकटून त्यांचा खडा बनतो. सुरुवातीस तो वाळू अथवा रेतीच्या स्वरूपात असतो. हळू हळू थरावरथर जमून तो मोठा होतो लहान रेतीच्या स्वरूपात असतो तो पर्यंत लघवीवाटे बाहेर पडण्यास अडचण पडत नाही. एकदा का तो मोठा झाला म्हणजे मूत्र मार्गातून बाहेर पडणे कठीण जाते. मूतखडे निरनिराळ्या आकाराचे व प्रकारचे असतात. कांही मुतखडे बदामी रंगाचे, गुळगुळीत, कठीण व गोलाकार अथवा चापट असतात. काही मुतखडे पांढरेशुभ्र व पोचट असतात आणि त्यांची भुकटी होऊ शकते. काही मुतखडे भुरकट अथवा काळ्या रंगाचे असतात. काही सराट्याच्या आकाराचे खडखडीत व टेंगळे आलेले असतात.
मुतखडे बनण्याच्या सुरुवातीच्या काळात ते रेतीच्या स्वरूपात असतानाच त्याचा उपाय केला तर मुतखडा बनण्यास प्रतिबंध होतो. मुतखडा मोठा झाल्यानंतर त्याला काढून टाकणे अवघड जात.१) मुत्रपिंडातील खडा : लघवीत क्षाराचे प्रमाण अधिक झाल्याने कंबरेत व कुशीत दुखावा असतो.थोड्याशा हालचालीने अधिक दुखावा होतो,असतो. खडा बारीक असेल तर मूत्रनळीतून मूत्राशयात जातो. पण तो मोठा लघवीत रक्त पडते. मूत्रपिंडातील मुतखडा मुत्राशयात उतरण्याच्या प्रवृत्तीचा असेल तर मूत्रनळीतून खाली मुत्राशयात येताना भयंकर कळा येतात. पोटात अतिशय दुखते, वांती होते, मूत्रपिंडात दुखावा होतो. वेदना थेट अंडाशयात व मांड्यात पोहोंचतात. अंड वर चढते, लघवी थोडी होते, ताप असतो. मूतखडा मूत्राशयात उतरला म्हणजे वेदना बंद होतात.२) मूत्राशयातील मुतखडा : मुतखड्याचा त्रास कमी अथवा अधिक असणे हे मुतखड्याच्या आकारावर अवलंबून असते. लघवी वारंवार करावी लागते. लघवी करताना दुखते. कधी कधी लघवी अर्धवट झाली असताना मध्येच बंद पडते.
लघवी करताना वेदना होणे, हे मुतखडा असल्याचे सूचक चिन्ह आहे. लघवी संपत आली म्हणजे आग होते. कारण त्यावेळी मुतखडा मुत्रमार्गाचे तोंडाशी आलेला असतो. कंबरेत दुखावा होतो. जननेंद्रियात वेदना होतात. मुले त्यामुळे शिश्न ओढतात व चोळतात. लघवी वारंवार करावी लागते. लघवी बहुत करून गढूळ असते. लघवीत चिकट पदार्थ पडतो. कधी कधी लघवी ताकासारखी पांढरी होते. कित्येक वेळा लघवीची धार एकदम अडकून बसते. खुप कुंथावे लागते. कांही रोग्याचे अंग बाहेर येते.उपचार : मुतखडा मोठा झाल्यानंतर त्यावर औषधाचा फारसा परिणाम होत नाही. शस्त्रक्रीया करूनच मुतखडा काढावा लागतो. मात्र सुरूवातीस लघवीस रेती येत असेल व मुतखडा बनण्यास सुरूवात झाली असेल त्या वेळी औषधांचा चांगला उपयोग होतो. खडा होण्याचे सुरूवातीस रोग्याच्या आहारामध्ये कॅलशियम असलेले पदार्थ टाळावेत.
उदाहरणार्थ लोणी, दूध दुधाचे पदार्थ, वडा, कॉफी, लिंबाचे सरबत देण्याचे टाळावे. रोज तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगावे. गोड पदार्थ आणि मिरची,लसूण व मसाल्याचे पदार्थ यांना प्रतिबंध करावा.आयुर्वेदिक औषधामध्ये –१) पाषाणभेद चूर्ण 1gm दिवसातून दोन वेळा ताकामधून द्यावे.२) गोक्षुरादिचूर्ण 1gm.३) गोक्षुरादिग्गुळ 1gm.४) शीलाबदर चूर्ण ५० मि. ग्रॅ. दिवसातून दोन वेळा ताकाचे अनुपानातूनवरील प्रत्येक औषध देत जावे.५) त्रिकंटकादिक्वाथ प्रत्येक वेळी दोन चमचे ताकाचे अनुपानातून दिवसातून तीन वेळा द्यावा.६) पुनर्नवादिग्गुळ दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ ताकाबरोबर द्याव्यात. मुतखडा गजग्या एवढा मोठा असेल तर शस्त्र कर्मच करावे. औषधाने उपाय न झाला तर शस्त्रकर्म करून मुतखडा काढून टाकावा लागतो.वरील पैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर किंवा कुठलेही औषध घेण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Share your comments