देशात सर्वत्र कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत आहे. या उन्हाच्या दिवसात दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी विशेष फायद्याचे ठरते. दह्यात असलेले पौष्टिक गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी एखाद्या संजीवनी पेक्षा काही कमी नाहीत.
यामुळे दहि खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. हे जरी वास्तव असलं तरीदेखील दही काही पदार्थांसोबत खाल्ल्यास आपल्या आरोग्यास विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सोबत दही खाल्ल्यास ते विष बनून जाते. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे आज आपण असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या सोबत दहीचे सेवन करू नये याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
दही आणि उडदाची डाळ सोबत खाऊ नये
जर आपण जेवणात उडदाच्या डाळीचे सेवन करत असाल तर त्यासोबत दही खाऊ नका. कारण यामुळे पोटा संबंधित अनेक विकार होऊ शकतात. उडीदाची डाळ आणि दही सोबत खाल्ल्याने आम्लपित्त, जुलाब यांसारख्या पोटाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात.
दही आणि दूधाचे एकत्रित सेवन करू नये
दही आणि दूध एकत्रपणे खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, उलटीची समस्या देखील होऊ शकते.
महत्वाची बातमी:-तुम्हीही रात्री उशिरा पर्यंत जागता का? मग, सावधान! यामुळे आपल्या आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
दही आणि आंबा चुकुनही सोबत खाऊ नये
उन्हाळ्यात आंबा खाणे बहुतेकांना आवडते, परंतु जर तुम्ही आंबा खात असाल तर अशा वेळी दही खाऊ नका. कारण आंब्यासोबत दह्याचे सेवन केल्यास त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
दही आणि कांदा
जेवण करताना सलाडमध्ये कांदा खाणे अनेकांना आवडते, परंतु जर तुम्ही कांद्याचे सेवन करत असाल त्यासोबत दही खाऊ नये. कारण कांदा आणि दही एकत्र खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
दही आणि आंबट फळे कधीही सोबत खाऊ नये
आंबट फळे आणि दही एकाच वेळी खाऊ नये. दह्यासोबत लिंबूवर्गीय फळांचे सेवन कधीच करू नये. जर आपण या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केले तर पोटाचा त्रास होऊ शकतो.
महत्वाची बातमी:-खरं काय! शिळी चपाती खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे; वाचा याविषयी
Share your comments