कोरोनाशी लढण्यासाठी तसेच करोनापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी नागरिक आता प्रतिबंधनात्मक उपाय करत असल्यामुळे औषधी वनस्पतींचे महत्व वाढले आहेत. औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीमुळे यांची कमतरता भासत आहे. या औषधी वनस्पतींमध्ये सर्वाधिक टंचाई ही गुळवेल या वनस्पतीची होतांना दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकी नर्सरी प्रमाणे हजारों गुळवेलाच्या वनस्पतींची विक्री झालेली निदर्शनात येत आहे. आता मात्र याची टंचाई होतांना दिसून येत आहे. गुळवेळाचे अनेक फायदे आहेत. गुळवेलाचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहून पोटाच्या अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. गुळवेल कावीळ, सांधेदुखी, दमा आदी आजारांवर अतिशय प्रभावी अशी ठरते.
गुळवेलचे अनेक फायदे आहेत
गुळवेल ही औषधी वनस्पती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करत असल्यामुळे कोरोना काळात नागरिकांनी गुळवेलचा औषधी म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. जास्त प्रमाणात ताप आल्यास तसेच टायफॉईड झाल्यास गुळवेलचा आवर्जून वापर केला जातो. गुळवेलच्या सेवनाने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्याचबरोबर कुष्ठरोग आणि अनेक त्वचारोगांवर गुळवेल फायदेशीर ठरते. पोटा संबंधित अनेक रोगांवर गुळवेल अत्यन्त उपयुक्त ठरते.
महाराष्ट्रात दीड कोटी रुपयांच्या गुळवेलची मागणी
गुळवेलाचे फायदे लक्षात येताच त्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात भर पडली असून एका आदिवासी गटाला जवळ जवळ दीड कोटी रुपयांच्या गुळवेलाची मागणी करण्यात आली असून डाबर, वैजनाथ, हिमालय या कंपन्यांकडून ही ऑर्डर देण्यात आली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी १ हजार ८०० पेक्षा अधिक नागरिक एकत्र आले होते. यानंतर नर्सरीच्या संख्येत वाढ झाली असून आदिवासी समाजाने आपल्या व्यवसायात वाढ केली आहे.
याचबरोबर इतर औषधी वनस्पतींचीही मागणी वाढली
गुळवेल नंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री झालेली औषधी वनस्पती म्हणजे तुळस. तुळशीचा वापर आपण चहा तसेच काढा बनवतांना करतो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. मुंबईमध्ये महानगरपालिकेने एका अहवालात सांगितले आहे की, दरवर्षी ३० हजारांपर्यंत तुळशीची रोपे विकली जात आहेत. याबरोबर कडुलिंब, अशवगंधा , जंगली हळद आदी वनस्पतींचीदेखील मागणी मोठ्या संख्येने वाढली आहे.
Share your comments