आरोग्य हीच संपत्ती असे कायम म्हंटले जाते. आपले आरोग्य उत्तम असेल तर आपण कुठल्याही संकटाशी सामना करू शकतो. शरीरास पोषकत्त्वे (Nutrients) मिळावे यासाठी विविध आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश आपण आहारात करतच असतो. लोह हे देखील आरोग्यासाठी आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे.
म्हणून शरीरासाठी लोह असते आवश्यक
शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते.
शरीरातील उती आणि अवयवांमध्ये प्रथिने (protein) पोहोचवण्यासाठी हे मदत करते. शरीरात लोहाची कमतरता असेल तर RBCs उतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यात अपयशी ठरतात. शरीरात लोहाची कमतरता (Iron dificiency) असल्यास विविध त्रासांना सामोरे जावे लागते.
लोहाच्या कमतरतेची लक्षणे
१) अशक्तपणा
२)फिकट त्वचा
३) डोकेदुखी
४) चक्कर येणे
५) हलकेपणा
६) अति थकवा
७) कमी भूक आणि ठिसूळ नखे
८) थंड हात पाय
लोहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोक लोह पूरक आहार (diet) निवडतात,
परंतु लोहाचे अति सेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. जास्त अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव लोहाच्या कमतरतेसाठी जबाबदार असते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये किंवा बाळाच्या वाढीवेळी लोहाची आवश्यकता असते.
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात लिंबूवर्गीय फळे (citrus fruits) किंवा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
Share your comments