वाढते वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे डाळ भात

27 January 2021 11:18 AM By: KJ Maharashtra

सध्याच्या काळामध्ये वजन वाढणे ही एक जटिल समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक भरपूर प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. परंतु या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक आहार सांगणार आहोत. जो सगळ्यांच्या घरांमध्ये बनतो. तो आहार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या किचन मध्ये बनणारा डाळभात.

 डाळ भात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:

बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की डाळ भाताचा सेवन केल्याने वजन वाढते. डाळ भात हे साधे जेवण आहे जे सगळ्यांच्या घरात तयार होते. डाळ भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डाळ भात वजन कमी करण्यासाठी लाभदायक सिद्ध होते.डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि तांदूळ मध्ये कार्बोहायड्रेट असते. जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळ सोबत खातात तेव्हा शरीराला कार्बोहायड्रेट सोबतच लागणारी महत्त्वाची विटामिन्स मिळतात. 

हेही वाचा:ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे

त्यामुळे शरीरात ऊर्जा तयार होते. आणि पचन व्यवस्था ठीक राहते. जर तुम्ही हप्त्यात चार वेळा आहारात डाळभात सेवन केले तर वजन न  वाढता ते घटते.

डाळ भात खाण्याचे फायदे:

  • डाळ आणि तांदळाचे कॉम्बिनेशन वजन घटवण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे कुठल्याही साईड इफेक्ट नव्हता वजन घटते
  • व्हेजिटेरियन लोकांसाठी डाळभात हा प्रोटीन चा महत्त्वाचा स्त्रोत आहे. डाळभात खाण्याने वजन घटते एवढेच नाही तर अन्य आरोग्यविषयक समस्याही कमी होतात.

हेही वाचा:ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व


  • डाळ भात मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोटाचे समस्या होत नाही.
Rice tur dal health weight loss
English Summary: Dal rice is beneficial for weight loss

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.