1. आरोग्य

खरं काय! मेथीचे दाणे सेवन केल्याने आपल्या शरीराला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fenugreek seeds

fenugreek seeds

भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले पदार्थ आपल्या नजरेला पडत असतीलच, या मसाल्या पदार्थापैकी एक आहे मेथीचे दाणे. मेथी भारतीय व्यंजनात मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते. आपण हिवाळ्यात मेथीचे लाडू मोठ्या चवीने खात असतो. मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठीउपयुक्त असल्याचे सांगितले जाते. यामध्ये असलेले पोषक घटक मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात त्यामुळे अनेक आहार तज्ञ मेथीच्या दाण्यांचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. मेथीच्या दाण्याचा उपयोग अनेक अन्नपदार्थात मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे अन्नपदार्थाची चव वाढण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे की मानवी शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्याचे कार्य करत असते. मेथी मध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक आयरन यासारखे अनेक खनिजे देखील मोठ्या प्रमाणात असतात. मेथीच्या दाण्याचे नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया मेथीच्या दाण्याचे सेवन केल्याने मानवी शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे.

पोटा संबंधित आजार दूर करण्यास मदत करते

अलीकडे बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे व आहारामुळे अनेक व्यक्ती पोटाच्या विविध समस्येमुळे त्रस्त असतात. पोटाच्या विकारात सर्वात गंभीर विकार आहे बद्धकोष्टतेचा आणि या समस्येमुळे अनेकजन त्रस्त असतात. तसेच पोट व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे अनेक व्यक्तींना नाना प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे काही व्यक्तींना भूक देखील लागत नाही. म्हणून पोटासंबंधित विकार असलेल्या व्यक्तींनी नियमित मेथीच्या दाण्याचे सेवन केले पाहिजे विशेषता मेथीचे दाणे अंकुरलेले सेवन केल्यास विशेष लाभ मिळतो.

लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्याचे सेवन करावे

ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास असतो, अर्थात ज्या लोकांचे वजन प्रमाणाबाहेर वाढलेले असते त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे अनेक गंभीर आजारहोण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणून जर आपणही या समस्येपासून त्रस्त असाल तर आपण नेहमीच मेथीच्या दाण्याचे सेवन केले पाहिजे, आपण यासाठी मेथीच्या चहाचे सेवन करू शकता.

केस गळती थांबविण्यास मदत करते

आजकाल बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, जर आपणही या समसेपासून त्रस्त असाल तर आपल्यासाठी मेथीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. जर आपण रोज मेथीचे सेवन केले तर आपणांस केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Disclaimer: Krishi Jagran Marathi या लेखात नमूद केलेल्या पद्धती, पद्धती आणि दाव्यांची पुष्टी करत नाही. या फक्त सूचना म्हणून घ्या. असा कोणताही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters