1. आरोग्य सल्ला

रूईची पाने व त्यांचे औषधी उपयोग

आपल्या हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रूतला असेल तर थोडेसे सुईने त्या जागेवरची स्किन काटा काढण्यासारखी करावी आणि तिथे रूईच्या पानाचा चिक लावा. थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रूईची पाने व त्यांचे औषधी उपयोग

रूईची पाने व त्यांचे औषधी उपयोग

मधमाशी, गांधिलमाशी, चावून तिचा काटा तसाच राहिला असेल तर तोही निघतो.कान दुखत असेल तर रूईचे पिकलेले पान घेऊन त्याला थोडा तुपाचा हात लावून गरम करावे. मग त्याचा रस कानात घालावा. असे दोन तिनदा केल्यावर बरे वाटते.पंच किंवा दशपर्णि द्रावणात पिकावर आँर्गेनिक स्प्रे करण्यासाठी रूई पानांचा उपयोग करतात. बेल, कडुलिंब, सिताफळ, उंबर, घाणेरी, करंजी, धोतरा इ. पानांचा अर्क + गोमूत्र

पांढरी रूईची फुले सुकवून नंतर ती थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि ती दोन चिमूट पूड मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो. मुका मार लागल्या ठिकाणी रूईची पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे.छातीत कफ जास्त झाल्यास रूईच्या पानाचा शेक देतात. डायबेटिसच्या पेशंट ने रूई ची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व चार तास ठेवावे. शुगर कमी होते.

विंचू चावला असेल तर, किंवा विषारी किटकदंश असेल तर तिथे रूईचा चिक लावावा. वेदना कमी होतात.रूईच्या पानांचा डिंक जर नायटा झालेल्या जागेवर लावला तर नायटा व इतरही त्वचारोग बरे होतात.रूईची फुले सुकवून याचे चुर्ण करून मधातून घ्यावे. अस्थमा, दमा, व श्वसनाचे, फुफ्फुसाचे आजार बरे होतात.

कुष्ठरोग रूईची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल मिसळून ते तेल जखमांवर लावल्यास त्या लवकर भरून येतात.रूईचे देठ व पाने पाण्यात भिजवून, नंतर ते पाणी मुळव्याधाच्या मोडाला, कोंबाला लावावे, तो गळून पडतो, व मूळव्याध बरी होते.

English Summary: Cotton leaves and their medicinal uses Published on: 17 May 2022, 12:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters